शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव अवतार महोत्सवाची सांगता

By admin | Updated: February 8, 2016 02:37 IST

मेहकरसह दिल्ली, वाराणसी आदी ठिकाणीही कार्यक्रम.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा) : विदर्भात वारकरी भक्तीपरंपरेचे बीजारोपण करणारे आणि कपाळी बुक्क्या सोबत अष्टगंध लावण्याची प्रथा रुढ करणारे मेहकर जन्मस्थळ असलेले संत बाळाभाऊ महाराज पितळे यांचा प्रणव अवतार महोत्सव येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर परिसरात ७ फेब्रुवारी रोजी पार पडला. परराज्यातही संत बाळाभाऊ महाराजांच्या भक्तांनी हा उत्सव साजरा केला. मेहकर येथे सन १८८८ ला जन्मलेले थोर संत बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्‍वासानंद सरस्वती यांनी जातीभेद निर्मुलन, धर्मशुद्धीकरण व समाजपरिवर्तनासाठी लक्षणीय कार्य केले. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय व वारकरी संप्रदायाचा त्यांनी त्रिवेणी संगम घडवून आणला. संत बाळाभाऊ महाराजांनी नेपाळसह देशभरात अविरत संचार करुन शेकडो नामसप्ताह, यज्ञ सोहळे, पायी वारी, चातुर्मास यामाध्यमातून भक्तीप्रसाराची ध्वजा फडकविली. महाराजांना नेपाळच्या राजघराण्याकडून पार्थिव लिंगपूजनाचा दुर्मिळ सन्मान मिळाला होता. त्यांनी उत्तरप्रदेशातल्या चित्रकूट येथे ह्यत्रिदंडी संन्यासह्ण घेऊन मध्यप्रदेशातल्या ओंकारेश्‍वर व महेश्‍वरच्या घनदाट अरण्यात ह्यकरतल भिक्षा, तरूतल वासह्ण ही तपश्‍चर्या केली. महाराणी अहिल्याबाई होळकरांचे राजवारस मार्तंडराव होळकर यांनी संत बाळाभाऊ महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते. अवघ्या ४२ वर्षांच्या जीवनकालात चारही आश्रमांचे पालन करुन परमहंस दीक्षा घेऊन त्यांनी उत्तरप्रदेशातल्या वाराणसी येथे संजीवन समाधी घेतली. महाराजांना मानणारा भक्तवर्ग आज महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही विखुरला आहे. त्यांच्या गुरूगादीवरील विद्यमान श्रीगुरू अँड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या उपस्थितीत मेहकर येथे तसेच दिल्ली, वाराणसीसह अन्य ठिकाणी महोत्सवानिमित्त कीर्तने, प्रवचने, दिंडी परिक्रमा, हरिपाठ, काकडा, गोलरींगण, भारूडे, महाप्रसाद अश्या भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती.