शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव मंजूत संतप्त शेतकर्‍यांचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:20 IST

बोरगाव मंजू : शासनाच्या पंतप्रधान पीक विम्याची वेबसाइट  मागील काही दिवसांपासून वारंवार बंद पडत असल्यामुळे संत प्त झालेल्या परिसरातील शेतकर्‍यांनी ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय  महामार्गावर बोरगाव मंजू ग्रामपंचायतसमोर ‘रास्ता रोको’  आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणार्‍या १९ शे तकर्‍यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

ठळक मुद्देपीक विम्याची वेबसाइट  मागील काही दिवसांपासून वारंवार बंद संत प्त झालेल्या परिसरातील शेतकर्‍यांनी ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय  महामार्गावर आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : शासनाच्या पंतप्रधान पीक विम्याची वेबसाइट  मागील काही दिवसांपासून वारंवार बंद पडत असल्यामुळे संत प्त झालेल्या परिसरातील शेतकर्‍यांनी ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय  महामार्गावर बोरगाव मंजू ग्रामपंचायतसमोर ‘रास्ता रोको’  आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणार्‍या १९ शे तकर्‍यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.पंतप्रधान पीक विमा काढण्याची वेबसाइट वारंवार बंद पडत  असल्याने या शेतकर्‍यांना ऑनलाइन पीक विमा न काढता  रिकाम्या हातांनी घरी परत जावे लागत होते.  बोरगाव मंजू  परिसरातील गावांमधील शेतकर्‍यांनी ४ ऑगस्ट रोजी येथील  सुविधा  केंद्रावर मोठय़ा संख्येने गर्दी केली; परंतु पीक विम्याची  वेबसाइट सतत बंद पडत असल्यामुळे ठरलेल्या मुदतीत पीक  विमा निघत नसल्याचे व नाहक त्रास होत असल्याचे पाहून  बोरगाव मंजूसह परिसरातील शेतकरी संतप्त झाले. या शेतकर्‍यांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतकरी नेते  गजानन देशमुख यांच्या  नेतृत्वात शासनाच्याविरोधात  घोषणाबाजी करीत ग्रामपंचायतसमोर महामार्गावर काही काळ  ‘रास्ता रोको’ आंदोलन केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी  वाहनांच्या रांगा लागल्या. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे  ठाणेदार पी.के. काटकर यांनी या बाबीची वेळीच दखल घेऊन  संतप्त शेतकर्‍यांची समजूत घालून त्यांना शांत केले. त्यापैकी  आंदोलन करणार्‍या १९ शेतकर्‍यांना पोलिसांनी सीआरपीसीच्या  ६८ कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करीत ताब्यात घेऊन नं तर कलम ६९ अन्वये सोडून दिले.