शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून गरिबांची लूट थांबवा! - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:13 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बच्चू कडू बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात हुंडी चिठ्ठीच्या आधारे होणाऱ्या व्यवहारातून आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अवाजवी कर्ज वसुलीतून गरिबांची होणारी लूट तातडीने थांबवून, यासंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना (एलडीएम) दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तारेणिया यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात हुंडी चिठ्ठीच्या आधारे होणाºया अवैध सावकारीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या कार्याचा आढावा जिल्हा उपनिबंधकांकडून पालकमंत्र्यांनी घेतला. हुंडी चिठ्ठीच्या आधारे अवैध सावकारीच्या व्यवहारासंदर्भात प्राप्त तक्रारीनुसार, या अवैध सावकारीच्या व्यवहारात कोण-कोण सहभागी आहे, यासंदर्भात शोध घेऊन, या व्यवहारातून गरिबांची होणारी लूट थांबली पाहिजे. त्यासाठी केलेल्या कारवाईचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांना दिले. तसेच महेंद्र फायनान्ससह जिल्ह्यातील सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारे कर्ज वाटप, कर्ज वसुलीत आकारण्यात येणारा अवाजवी व्याज दर आणि त्यामधून होणारी गरिबांची लूट थांबविण्यासाठी केलेल्या कारवाईचा अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तारेणिया यांना दिले.

फालतू उत्तर देऊ नका; कारवाई करा!हुंडी चिठ्ठी व्यवहारातून लुबाडणूक झाल्याची तक्रार २०१७ मध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे करण्यात आली; मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती बैठकीत एका व्यक्तीने पालकमंत्र्यांना दिली. त्यानुषंगाने पालकमंत्र्यांनी यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांना विचारणा केली असता, जिल्हा उपनिबंधकांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याने, ‘फालतू उत्तर देऊ नका, धाडी टाकून कारवाई करा’ असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले.

टॅग्स :AkolaअकोलाBacchu Kaduबच्चू कडू