शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडची तूर खरेदी बंद, वाहनांच्या रांगा!

By admin | Updated: March 25, 2017 01:45 IST

बारदान्याअभावी तूर खरेदी थांबली; हजारो शेतक-यांना मापाची प्रतीक्षा.

अकोला, दि. २४- नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्रावरील तुरीची खरेदी सोमवारपासून बंद पडली असून, शेकडो वाहनांच्या रांगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लागल्या आहेत. बारदान्याअभावी तूर खरेदी थांबल्याचे सांगितल्या जात आहे; परंतु तूर खरेदी कधी सुरू होईल, याबाबत नाफेडचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. गत काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जिनिंगमध्ये नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंंंत दीड लाख क्विंटल तूर नाफेडने ५0५0 रुपये दराने खरेदी केली. व्यापार्‍याच्या तुलनेत नाफेडचा दर अधिक मिळत असल्याने, शेतकरी नाफेड खरेदी केंद्रावरच तूर विक्रीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे नाफेडच्या केंद्रावर शेतकर्‍यांची प्रचंड गर्दी होत आहे. गत काही दिवसांमध्ये तुरीने भरलेल्या ७५0 ट्रॉली बाजार समितीच्या आवारात उभ्या होत्या. त्यात अध्र्याधिक तुरीची नाफेडने खरेदी केली; परंतु नाफेडकडील बारदाना संपल्यामुळे नाफेडच्या अधिकार्‍यांनी सोमवारपासून तुरीची खरेदी बंद केली. त्यामुळे सद्यस्थितीत २0 हजार क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत असून, शेतकर्‍यांचा मुक्काम वाढत आहे, तसेच त्यांच्या मालवाहू वाहनाचेसुद्धा भाडे दिवसागणिक वाढत आहे. बारादाना उपलब्ध झाल्यानंतरच आम्ही तुरीची खरेदी करू; परंतु बारादाना आला नाही, तर आम्ही तूर खरेदीसंदर्भात निश्‍चित सांगू शकत नाही, असे नाफेडचे अधिकारी शेतकर्‍यांना सांगत असल्याने, शेतकर्‍यांना चिंता सतावत आहे. त्यामुळे विक्रीसाठी आणलेली तूर बाजार समितीतील व्यापार्‍याला विकावी की नाफेडमध्ये विकावी, अशा संभ्रमात शेतकरी पडला आहे.