अकोला: शाळेतील बदली करण्यात आलेल्या शिक्षिकेच्या रिक्त जागेवर शिक्षकाची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी बाश्रीटाकळी तालुक्यातील जामवसू येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्या र्थ्यांंसह पालकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला.बाश्रीटाकळी तालुक्यातील जामवसू येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवीमध्ये २३0 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, या शाळेतील आठ शिक्षकांपैकी एका शिक्षिकेची बदली करण्यात आली. तसेच एक शिक्षिका दीर्घ रजेवर असल्याने शाळेत वर्ग आठ आणि शिक्षक सहा अशी स्थिती आहे. यासंदर्भात बाश्रीटाकळी पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकार्यांकडे अर्ज देऊन, शाळेतील रिक्त पदावर शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली; मात्र अद्याप याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शाळेतील रिक्त पदावर तातडीने शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करीत जामवसू येथील शाळेच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत धडक दिली.
जामवसूच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या
By admin | Updated: September 28, 2014 01:49 IST