शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळय़ा झालेल्या दोन चोर्‍यांचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:36 IST

तापडिया नगरातील पवनसुत अपार्टमेंटमध्ये व  दुर्गा चौकातील एका घरात १३ सप्टेंबर रोजी भरदुपारी  झालेल्या चोर्‍यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. स् थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला शेगाव तालु क्यातील भोनगाव येथून अटक केली.

ठळक मुद्दे१३ सप्टेंबर रोजी भरदुपारी  झालेल्या चोर्‍यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तापडिया नगरातील पवनसुत अपार्टमेंटमध्ये व  दुर्गा चौकातील एका घरात १३ सप्टेंबर रोजी भरदुपारी  झालेल्या चोर्‍यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. स् थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला शेगाव तालु क्यातील भोनगाव येथून अटक केली.रामदासपेठ पोलीस ठाण्यातील संजय दयाराम चौधरी हे प त्नीसह बाहेरगावी गेले होते. दुपारी त्यांच्या घरी अज्ञात  चोरट्याने प्रवेश करून घरातून ६२ हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने चोरून नेले होते, तर यापूर्वी सकाळी ११  वाजता दुर्गा चौकातील प्रमिला राजकुमार थोटे या शेतीच्या  कामासाठी बाहेर गेल्या असताना त्यांच्या जानकी अ पार्टमेंटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ३६  हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हो ता. पोलिसांनी शेगाव तालुक्यातील भोनगाव येथील मंगेश  दिलीप पहुरकर (२२) याला अटक केली. त्याची सखोल  चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी  आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २१  सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  चोरट्याकडून आणखी काही चोर्‍या उघडकीस येण्याची श क्यता आहे.

गीतानगरमध्ये घरफोडीगीतानगरातील भरतीया भवनजवळ असलेल्या नावकार अ पार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री चोरी करीत  दोन सोन्याच्या साखळय़ा व चांदीचे दागिने लंपास केल्याची  घटना रविवारी उजेडात आली. या प्रकरणात अज्ञात  चोरट्यांविरुद्ध जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीतानगरमध्ये  असलेल्या नावकार अपार्टमेंटमध्ये पंकज पनपालिया हे  रहिवासी आहेत. ते शनिवारी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले  असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून एक  चांदीचे ताट, एक चांदीची वाटी व सोन्याच्या दोन चेन, असा  हजारो रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला. या  घटनेची माहिती मिळताच जुने शहरचे ठाणेदार विनोद ठाकरे  यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर  या प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून  चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.