शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यावसायिकासह चोरटे जेरबंद

By admin | Updated: March 19, 2015 01:41 IST

चौघांनाही २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी.

अकोला - बाश्रीटाकळी येथील सराफा व्यावसायी तळोकार याला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ४00 ग्रॅम सोने लुटणार्‍या तीन चोरट्यांसह त्यांच्याकडील सोने खरेदी करणार्‍या अकोला येथील सराफा व्यावसायिकास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या चारही जणांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कुरिअरद्वारे अकोल्यात आलेले सोने घेऊन जात असलेल्या इसमास मारहाण करून सुमारे अडीच किलो सोने लुटल्याची घटना ३ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणातच पोलिसांच्या एका विशेष पथकाने मंगळवारी रात्री माळीपुरा आणि दगडी पूल परिसरातील रहिवासी रोहित तिवारी, राकेश शर्मा व शिवा घोडेराव या तिघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये या तीनही चोरटयांनी १३ मार्च २0१५ रोजी बाश्रीटाकळी येथील सराफा व्यावसायी तळोकार याच्याकडील सुमारे ४00 ग्रॅम सोने लुटल्याची माहिती दिली. यासोबतच सदर सोने हे अकोल्यातील सराफा व्यावसायी रितेश नांदूरकर याला विक्री केल्याचेही पोलिसांसमोर कबूल केले. या तीन चोरट्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश नांदूरकर याला अटक केली असून, त्यानेही हे सोने आणखी एका सराफा व्यावसायिकास विक्री केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तीन चोरट्यांसोबतच रितेश नांदूरकर याला पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. या चोरट्यांसह सराफा व्यावसायी नांदूरकर याच्याकडून चोरीतील सोने खरेदीबाबत विचारपूस करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली असता न्यायालयाने चारही आरोपींना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.