शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तब्येत सांभाळा; पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST

अकोला : गत तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. ...

अकोला : गत तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यात जवळपास २० दिवसांच्या खंडानंतर पावसाचे आगमन झाले. यामुळे कोमेजलेल्या पिकांना जीवदान मिळाले. सलग पाच दिवस पाऊस बरसल्यानंतर सहाव्या दिवशी पावसाने उघडीप दिली. मागील तीन दिवसांपासून पावसाची दडी आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. रिपरिप पावसाच्या वातावरणानंतर एकाएक कडाक्याचे ऊन तपायला लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. नागरिकही हैराण झाले आहेत. त्यातच पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. वारंवार बदलत्या वातावरणाने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

आकडेवारी काय सांगते?

महिना अपेक्षित पाऊस झालेला पाऊस किमान तापमान कमाल तापमान

जून १७२.३ मिमी १३६.९ मिमी २०.६ ३५.४

जुलै २५४.९ मिमी ३०६.८ मिमी १९.५ ३२.०

ऑगस्ट १६९.८ मिमी १२१.२ मिमी २२.४ ३३.१

कोठे किती पाणीसाठा

प्रकल्प पाणीसाठा (दलघमी) पाणीसाठा (टक्क्यांत)

काटेपूर्णा ८०.५० ९३.२३

वान ५९.०१ ७२.०१

निर्गुणा २८.८५ १००

ऑगस्टमध्ये सर्वांत कमी पाऊस

जिल्ह्यात जून महिन्यात सुरुवातीलाच चांगला दमदार पाऊस पडला होता.

तर जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती.

या महिन्यात २१ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

मात्र, ऑगस्ट महिन्यात सर्वांत कमी पावसाची नोंद झाली. तीन दिवस कोरडे गेले.

वातावरण बदलले; काळजी घ्या...

गत तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणात बदल झाला आहे.

त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून काळजी घेण्याची गरज आहे.

त्यातच डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने आणखी सतर्कता बाळगावी.

अनेक साथीचे आजार बळावत असून गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.