शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मॅक्सिन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास न्यायालयाची स्थगिती

By admin | Updated: August 3, 2016 01:46 IST

१८ लाखांच्या देयकांच्या बदल्यात तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी २0 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप.

अकोला: मॅक्सिन कॉर्पोरेशन कंपनीच्या याचिकेवर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशाला मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायालयाच्या आदेशामुळे संबंधित अधिकार्‍यांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागातील वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा कंत्राट प्रशासनाने मुनव्वर शेख अब्दुल सत्तार यांच्या मॅक्सिन कॉर्पोरेशन कंपनीला दिला होता. मुनव्वर शेख यांनी पालिका प्रशासनाकडे सादर केलेल्या १८ लाखांच्या देयकांच्या बदल्यात तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी २0 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप तक्रारकर्त्या शेख यांनी केला होता. तसेच सहायक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दूर, अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे व कर्मचारी मनीष कथले यांच्या माध्यमातून करारनाम्याच्या दस्तावेजमध्ये खोडतोड केल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. तसेच स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी यशदीप मेश्राम यांनी तत्कालीन आयुक्तांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून जिल्हा व सत्र न्यायालयात प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले. याविषयी जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जी.भालचंद्र यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. मनपाची बाजू अँड. सुभाष काटे, अँड. तळोकार यांनी मांडली.