शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कृषीच्या विशेष घटक योजनेचा राज्यभरात गोंधळ

By admin | Updated: January 22, 2017 03:05 IST

योजनेतील बदलाबाबत मार्गदर्शन मागविले

अकोला, दि. २१- कृषी विभागाकडून राबविल्या जाणार्‍या विशेष घटक योजनेत शासनाने बदल केला. त्यामुळे चालू वर्षातील नवीन लाभार्थी निवडीचा गोंधळ झाला आहे. त्यामुळे चालू वर्षात योजना राबविण्यासाठी शासनाकडूनच पुणे येथील कृषी उपसंचालक कार्यालयाने मार्गदर्शन मागविले आहे. त्यातच अनेक जिल्हय़ातील निवड प्रक्रियाही आचारसंहितेमुळे रखडली आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्‍यांसाठी कृषी विभागाने १९८२-८३ पासून विशेष घटक योजना सुरू केली होती. त्या योजनेतून शेतकरी लाभार्थींना जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण अवजारे, शेतीची सुधारित अवजारे, बैलजोडी, बैलगाडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाइपलाइन, पंपसेट, नवीन विहीर निर्मितीसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येत होते. दरम्यान, शासनाने चालू वर्षात योजनेचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे करण्यात आले. तसेच लाभाचे स्वरूपही बदलले. योजनेतून शेतकर्‍यांना प्राधान्याने विहिरीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी अनुदानाची कमाल रक्कम २ लाख ८५ हजार रुपये आहे. त्यामध्ये नवीन विहीर, त्यासोबत वीज जोडणी, पंपसंच, सूक्ष्म सिंचनासाठी २0१७-१८ पासून शेतकर्‍यांची निवड केली जाणार आहे; मात्र चालू योजनेसाठी २0१६-१७ या वर्षात निवड झालेल्या लाभार्थींना त्याचा लाभ दिला जाणार नाही. जुन्या दरानेच रक्कम दिली जाईल, असे शासन निर्णयात म्हटले आहे; मात्र त्या शासन निर्णयातील चार मुद्यांमुळे निवड समितीचा गोंधळ झाला आहे. - निर्णयातील चार मुद्दे ठरले डोकेदुखीशासनाच्या ५ जानेवारी २0१७ रोजीच्या निर्णयातील चार मुद्यांवर राज्यभरातील अधिकारी गोंधळले आहेत. त्यामध्ये मुद्दा क्रमांक तीनमध्ये निर्णयापूर्वी निवड झालेले आणि नंतरचे लाभार्थी, पाचमध्ये चालू वर्षातील लाभार्थींना नवीन विहिरींसाठी नव्या दराने व इतर लाभार्थींना जुन्या दराने अनुदान देण्याचे म्हटले आहे. मुद्दा क्रमांक १३ मध्ये महावितरणकडून सोलर पंप मंजूर असेल, तर अनुदानाची रक्कम कंपनीला देणे, मुद्दा क्रमांक १७ मध्ये विहिरींचे उद्दिष्ट डिसेंबर २0१७ पर्यंत पूर्ण करण्याचे म्हटले आहे. त्यावर मार्गदर्शन करावे, असे पत्र कृषी विभागाने शासनाकडे १0 जानेवारी रोजी पाठविले आहे.  शासन निर्णयातील काही मुद्यांनुसार योजनेची अंमलबजावणी कशी करावी, यावर शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. ते मिळताच निवड समित्यांकडून कार्यवाही सुरू केली जाईल. - घाडगे, उपसंचालक, कृषी आयुक्त कार्यालय, पुणे.