शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मिठापेक्षा तंबाखू उत्पादक उद्योग जास्त

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

राज्यात ४३ मीठ उद्योग तर ११0 तंबाखू उद्योग अस्थायी स्वरूपात.

नीलेश शहाकार/बुलडाणा मानवी शरीरास मीठ हे आरोग्यवर्धक समजले जाते, शिवाय जेवण रुचकर बनविण्यासाठी त्याची गरज असते, तरीही राज्यात मीठ उत्पादक उद्योगापेक्षा आरोग्यास घातक असलेल्या उद्योगाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत राज्यभरात मीठ उत्पादन करणारे केवळ ४३ कारखाने असून, तंबाखू उत्पादनात मात्र ११0 उद्योग गुंतले असल्याची बाब पुढे आली आहे. राज्यात मीठ उत्पादकाला बर्‍याच र्मयादा येतात, बहुदा सागरी किनारपट्टी लाभलेल्या ठिकाणीच मीठ उत्पादन केले जाते. मात्र मीठ स्वच्छता व पॅकिंग करणारे उद्योग राज्यात बर्‍याच ठिकाणी आहेत. असे असतानाही आरोग्यास घातक आणि बंदी असणारे बिडी, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ निर्मिती करणारे उद्योग राज्यातील अनेक भागात सुरू असल्याचे चित्र बाजारपेठेत उपलब्ध तंबाखूजन्य उत्पादनावरून स्पष्ट झाले आहे.शासनाच्या २0१५-१६ च्या आर्थिक अहवालानुसार, राज्यात तंबाखू उत्पादन करणार्‍या १२४ अस्थायी स्वरूपात उद्योगांना २0१४ पर्यंंत मान्यता देण्यात आली. २0१५ मध्ये तंबाखू उत्पादनावर सचित्र वैज्ञानिक इशारा घालण्याचे बंधन शासनाने लावले. शिवाय तंबाखूविरोधी मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या कायद्यातून बर्‍याच उद्योगांना चपराक बसल्यामुळे आजरोजी ११0 तंबाखू उद्योग अस्थायी स्वरूपात सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र जीवनावश्यक मीठ उत्पादक उद्योगांपेक्षा हा आकडा निश्‍चित मोठा आहे.शासनाकडे नोंदणी नाही!राज्यातील सोलापूर, संगमनेर, अहमदनगर, पुणे, मुंबई, सिन्नर, नाशिक, नांदेड, देगळूर, कोल्हापूर, गोंदिया, नागपूर या ठिकाणी तंबाखू व बिडी उद्योग आहे. तेंदूपत्ता पिकवणारे बरेच छोटे शेतकरी, शेतमजूर यांचे पोट या उद्योगांवर अवलंबून आहे. बुलडाण्यातही तेंदूपत्ता गोळा करण्याचा व्यवसाय मोताळा तालुक्यात केला जातो, तर काही ठिकाणी तंबाखू प्रक्रिया उद्योग पारंपरिकरीत्या केले जात असल्याने त्याची शासनाकडे नोंद नाही, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्र, बुलडाणा यांच्याकडून प्राप्त झाली.उद्योग नोंदणीतून तंबाखू उद्योग वगळला!उद्योग निर्मिती नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन राबविल्या जात आहे. ह्यतंबाखूमुक्त महाराष्ट्रह्ण अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देत, उद्योग नोंदणीच्या सांकेतिक स्थळाहून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ निर्मिती उद्योग स्थापन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे तंबाखू उद्योग कोणालाही स्थापन करण्यास निर्बंध घालण्यात आला आहे.