शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

 राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 16:33 IST

२४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील आठ विभागातील खेळाडू सहभागी होणार आहे.

अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अकोल्यात केले आहे. २४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील आठ विभागातील खेळाडू सहभागी होणार आहे. १४, १७, १९ वर्षाआतील सुमारे २८८ खेळाडू स्पर्धेत खेळप्रदर्शन करणार आहेत. तर थेट राज्यस्तर चाचणीत १४६ खेळाडू आपले कौशल्य आजमावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.स्पर्धेची सविस्तर माहिती देण्याकरिता शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.राज्यस्तर स्पर्धेत सहभागी खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था आयोजन समितीमार्फत करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र व प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना स्मृतिचिन्ह व प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेला महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा बॅडमिंटन आणि शटलर्स संघटनेच्या तांत्रिक सहकार्य लाभणार आहे.स्पर्धेचे उद्घाटन २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत नियुक्त केलेल्या निवड समिती सदस्यांचे नियंत्रणाखाली २६ सप्टेंबरपासून निवड चाचणीचे आयोजन केले आहे. २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन १४ वर्षाआतील स्पर्धा नोएडा (उत्तर प्रदेश), १७ वर्षाआतील गटाची स्पर्धा छिंदवाडा (मध्यप्रदेश), १९ वर्षाआतील गटातील स्पर्धा पुणे (महाराष्ट्र) येथे होणार आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, तालुका क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाणे, बॅडमिंटन प्रशिक्षक निषाद डिवरे, तुषार देशमुख यांची उपस्थिती होती. 

 

टॅग्स :AkolaअकोलाBadmintonBadminton