शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 22:51 IST

कृषी प्रदर्शन होणार आहे.

अकोला : कृषी क्रांतीचे प्रणेते भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर २७ ते २९ डिसेंबरपर्यंत तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञान, संशोधन आदींसह आधुनिक शेती विषयावर शेतकºयांसाठी माहिती उपलब्ध करू न दिली जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत स्व. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १९५९ साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या जागतिक कृषी प्रदर्शनाचे हीरकमहोत्सवी वर्ष तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोटेक २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील शेती शाश्वत आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी शेतीशास्त्रातील अभिनव तंत्रज्ञान, कौशल्य विकास, पूरक व्यवसायातील, गट शेतीतील, प्रक्रिया उद्योगातील संधी, बदलत्या जागतिक परिस्थितीत फायदेशीर शेतीचे तंत्र आणि एकंदरीत शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी आशादायी, प्रेरणादायी, व्यवसायाभिमुख माहितीचा खजिनाच यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनात फळबाग, भाजीपाला, वनौषधी, फुलशेती, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशुपालन व दुग्ध व्यवसाय, कृषी प्रक्रिया, कृषी अभियांत्रिकी, सेंद्रिय शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर आधारित विविध विभागांची दालने तसेच इतर शासकीय, निमशासकीय, सेवाभावी, स्वयंसेवी, खासगी संस्थांचीसुद्धा दालने शेतकºयांचे मनोबल वाढविणार आहेत. तीन दिवस दुपारी २ ते ४ वाजतापर्यंत शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद, प्रगतशील शेतकºयांचे मनोगत व मान्यवरांच्या संबोधनासोबतच मनोरंजनात्मक कलेतून समाजप्रबोधन करणारे सुप्रसिद्ध समाजसुधारक सप्तखंजिरीसम्राट सत्यपाल महाराजांची सत्यवाणीआणि सुप्रसिद्ध हास्यसम्राट अ‍ॅड. अनंत खेळकर यांचे सादरीकरण उपस्थितांमध्ये नवचैतन्य भरणार आहेत.
टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती