शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस ९ ऑक्टोबरपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:47 IST

अकोला : तब्बल सहा महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटला असून, येत्या ९ ऑक्टोबर २0१७ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात निवडलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने विधी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेवर मोठा परिणाम दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देअखेर केंद्रीय ऑनलाइनचा तिढा सुटला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तब्बल सहा महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटला असून, येत्या ९ ऑक्टोबर २0१७ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात निवडलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने विधी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेवर मोठा परिणाम दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मेडिकल, इंजिनिअरिंग अभ्यासक्रमानुसार विधीची प्रवेश प्रक्रियादेखील केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने व्हावी, असा प्रस्ताव पुढे आल्याने विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया मागील वर्षापासून ऑनलाइन सुरू झाली; मात्र अजूनही त्यातील गोंधळ दूर झालेला नाही. २0१७-१८ च्या विधी अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी २0 आणि २१ मे १७ रोजी ऑनलाइन परीक्षा घेतली गेली. १ जून १७ रोजी निकालही जाहीर झाला; मात्र मुंबई विद्यापीठाचा निकाल न लागल्याने संपूर्ण विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. दरम्यान, मुंबई विद्यापीठाचा निकाल लागल्याने हा तिढा सुटला. त्यामुळे  पहिली विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली. विद्यार्थ्यांना आता ९ ऑक्टोबरपासून कॉलेजमधून यासंदर्भात माहिती मिळणार आहे. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येईल. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.त्यामुळे प्रत्यक्षात विधी महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाला नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. आता राज्यातील ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली होती, त्यातील अनेकजण इतर अभ्यासक्रमाकडे वळले आहेत. तब्बल सहा महिन्यांचा कालावधी या प्रक्रियेसाठी लागल्याने आता विधी महाविद्यालयात किती विद्यार्थी प्रवेश घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.