शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे करून तूर खरेदी सुरू करा!

By admin | Updated: April 27, 2017 01:35 IST

अकोला- तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना (डीएमओ) दिले.

अकोला : शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवरील तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना (डीएमओ) दिले. त्यामुळे जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या तूर खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी गत २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून बंद करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली आल्याने, जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यापासून मोजमापाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या १ हजार ९६३ ट्रॅक्टरमधील १ लाख ७ हजार ९७ क्विंटल तुरीचे मोजमाप रखडले होते. नाफेडद्वारे हमीदराने तूर खरेदी बंद करण्यात आली आणि बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, तूर कोणाला आणि कुठे विकणार, याबाबतचा प्रश्न तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर तूर खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलनेही करण्यात आली. दरम्यान, तूर खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. यासंबंधीचा आदेश बुधवार, २६ एप्रिल रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला शासनामार्फत प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील नाफेडद्वारे तूर खरेदीच्या पाचही खरेदी केंद्रांवर मोजमाप बाकी असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या पथकांकडून खरेदी केंद्रांवरील तुरीचे पंचनामे करण्यात येणार आहे.बाजार समितीमध्ये शेतकरी सात-बारा आणल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या वतीने जे नाव सांगितले जाते, त्या नावानेच टोकन दिले जाते; परंतु हयात किंवा मृत्यूच्या दाखल्याची मागणी गेटवर मागणी केल्या जात नाही. - माधव पाथ्रीकर, सचिव, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती. हा प्रकार जर सत्य असेल, तर दोषींवर कारवाई करण्यात यावी, असे प्रकार होणे अत्यंत गंभीर बाब आहे. - श्याम भोपळे, विरोधी पक्षनेता, तेल्हारा. सात-बाराप्रमाणे सदर शेतकऱ्याची नोंदणी झाली तसेच मोजमापही झाले. शेतकरी मयत असताना असे प्रकार करणे योग्य नाही. ज्यांच्या नावे तूर मोजली त्यांच्या नावाने धनादेश देऊ. - मनोज वाजपेयी, डीएमओ, नाफेड, अकोला.