शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती : जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी नाही; भाजपाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:56 IST

अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आठ सदस्य पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात २२ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आठ सदस्य पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात २२ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्थायी’मधून सत्ताधारी भाजपाचे पाच सदस्य निवृत्त होणार आहेत. यादरम्यान, जुन्या चेहºयांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे संकेत भाजपमधून मिळत आहेत.शहरातील विकास कामांची गाडी रुळावर येत असल्याचे पाहून अकोलेकरांनी फेब्रुवारी २०१७ मधील महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले. मनपातील एकूण ८० नगरसेवकांपैकी ४८ नगरसेवक भाजपचे असून, निकषानुसार मनपा स्थायी समितीमध्ये सभापती पद व १६ सदस्यांपैकी १० सदस्य भाजपचे आहेत. २०१७ मध्ये स्थायी समितीपदी नगरसेवक बाळ टाले यांना संधी दिल्यानंतर २०१८ मध्ये नगरसेवक विशाल इंगळे यांना सभापदी पदाची जबाबदारी देण्यात आली. या महिन्यात ‘स्थायी’मधील १६ पैकी आठ सदस्यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने संबंधित सदस्यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. यामध्ये सत्तापक्ष भाजपमधील पाच सदस्यांचा समावेश असून, उर्वरित तीन सदस्यांमध्ये काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडीतील नगरसेवकांचा समावेश आहे. निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी मनपा प्रशासनाने २२ फेब्रुवारी रोजी महापालिकेत विशेष सभेचे आयोजन केले आहे. अर्थातच, स्थायी समितीमध्ये निवड होण्यासाठी भाजपसह इतर राजकीय पक्षांतील इच्छुक नगरसेवकांनी ‘लॉबिंग’ सुुरू केल्याची माहिती आहे.यांचा आहे समावेशआज रोजी स्थायी समितीमध्ये भाजपकडून विनोद मापारी, अनिल गरड, अर्चना मसने, शारदा खेडकर, नंदा पाटील, सेनेच्या मंजूषा शेळके, लोकशाही आघाडीच्या अ‍ॅड. धनश्री देव, काँग्रेसचे इरफान खान कायम आहेत.शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष२०१७ मध्ये स्थायी समितीत शिवसेनेच्यावतीने गटनेता राजेश मिश्रा, सपना नवले यांना संधी देण्यात आली होती. ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली असता राजेश मिश्रा यांना समितीच्या बाहेर व्हावे लागले. त्यांच्या जागेवर मंजूषा शेळके यांना संधी देण्यात आली. यंदा सपना नवले निवृत्त होणार असल्या तरी वेळप्रसंगी मंजूषा शेळके यांनाही बाहेर ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. अर्थात, त्याऐवजी पक्षातील दोन चेहºयांना संधी दिली जाण्याचे संकेत आहेत.

सभापती पद होणार रिक्तस्थायी समितीचे विद्यमान सभापती विशाल इंगळे यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. विशाल इंगळे सदस्य पदावरून निवृत्त होताच ‘स्थायी’चे सभापती पद रिक्त होणार आहे. सभापती पदावर निवड व्हावी, यासाठी भाजपमधील इच्छुकांना डोहाळे लागले आहेत. पक्षातील प्रत्येकालाच संधी मिळावी, असा पक्षश्रेष्ठींचा सूर असल्याने सभापती पदाची माळ कोणाच्या गळ््यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आठ सदस्य होतील निवृत्तविद्यमान स्थायी समितीमधून सभापती विशाल इंगळे, बाळ टाले, सुनील क्षीरसागर, सुजाता अहिर, पल्लवी मोरे, शिवसेनेच्या सपना नवले, काँग्रेसच्या शाहीन अंजूम मेहबुब खान व राकाँप्रणीत लोकशाही आघाडीच्या उषा विरक निवृत्त होत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका