अकोला, दि. ३१: खदान पोलीस ठाणे, सिंधी कॅम्प ते कौलखेड रोडवरील रस्त्यालगतच्या अतिक्रमकांना हुसकावताना काही अतिक्रमकांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.बुधवारी खदान पोलीस स्टेशन ते सिंधी कॅम्प ते कौलखेड चौकपर्यंत मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणार्या अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई सुरू होती. पथक प्रमुख विष्णू डोंगरे यांच्यासह कर्मचार्यांवर अचानक कौलखेड येथील जांगिड मंगल कार्यालयासमोर काही अतिक्रमकांनी दगडफेक केली.
अतिक्रमण पथकावर दगडफेक
By admin | Updated: September 1, 2016 02:41 IST