लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्व एसटी कामगार संघटना एकवटल्या असून, राज्यव्यापी संपाचे हत्यार उगारावे की नाही, या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी शुक्रवार, २६ मे रोजी अकोल्यासह राज्यातील सर्व विभागांत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा देऊन, सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. तत्पूर्वी १ एप्रिल २०१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ द्यावी, तसेच कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी या प्रमुख मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या सर्व कामगार संघटना एकवटल्या आहेत. त्यासाठी संयुक्त कृती समितीदेखील तयार करण्यात आली आहे. राज्य शासनाने सर्व मागण्यांची त्वरित पूर्तता करावी, या मागणीसाठी २६ व २७ मे रोजी राज्यव्यापी संपाचे हत्यार उगारण्यात येणार आहे. तत्पूर्वी संपाबाबत एसटी कामगारांचे मत जाणून घेण्यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानंतर राज्यव्यापी संपाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. मतदान प्रक्रियेस ‘मान्यताप्राप्त’, इंटक, महा. मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघना, विदर्भ एसटी कामगार संघटना व संघर्ष ग्रुप यांनी पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती अविनाश जहागीरदार यांनी ‘लोकमत’ला दिली. या ठिकाणी होणार मतदानमध्यवर्ती बसस्थानक, जुने बसस्थानक, विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, अकोट डेपो, तेल्हारा डेपो, मूर्तिजापूर डेपो, वाशिम डेपो, कारंजा डेपो, मंगरूळपीर डेपो, रिसोड डेपो या ठिकाणी शुक्रवारी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.फसवेगिरी होण्याची शक्यता असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ नये.- देवीदास बोदडेविभागीय सचिव, महा. एसटी कामगार सेना, अकोला.
एसटी कामगार संघटना एकवटल्या !
By admin | Updated: May 26, 2017 02:54 IST