शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या आपत्कालीन खिडक्यांची ‘आफत’!

By admin | Updated: August 10, 2016 01:14 IST

देखभाल-दुरुस्तीचा अभाव: प्रवाशांच्या जिवाला घोर.

अकोला, दि. 0९: जुन्या एसटीमध्ये एकच संकटकालीन दरवाजा आहे. दुदैर्वाने अपघात घडल्यास प्रवाशांना बाहेर पडण्यास तो अपुरा ठरतो. ही बाब लक्षात घेऊन, ताफ्यात नव्याने दाखल होणा-या प्रत्येक ह्यएसटीला दोन आपत्कालीन खिडक्या लावण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय निश्‍चित यथायोग्य म्हणावा लागेल; मात्र सध्या अस्तीत्वात असलेल्या आपत्कालीन खिडक्यांच्या स्थितीची तपासणी कोण करणार हाच प्रश्न आहे. महाड येथील दूर्घटना घडल्याच्या पृष्ठभूमीवर अकोल्यातील बसगाड्यांचे आपत्कालीन खिडक्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी स्टिंग केले असता या खिडक्या व दरवाजेच आफत ठरतील असे असल्याचे वास्तव उघडकीस आले.महाराष्ट्रात मोठय़ा शहरापासून लहान, दुर्गभ भागात दररोज हजारो एसटी बसेस धावतात. सुरक्षित प्रवास म्हणून एसटी बसकडे पाहिले जाते. प्रवासादरम्यान दुर्दैवाने एखाद्यी आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास प्रवाशांना वेळीच बाहेर पडता यावे याकरिता प्रत्येक बसला एक संकटकालीन दरवाजा असतो. काळानुरूप त्याची जागा बदलली. जुन्या बसगाड्यांमध्ये तो पाठीमागे असून, तर त्यानंतर दाखल झालेल्या गाड्यांमध्ये ही व्यवस्था चालकाच्या मागील असनाजवळ करण्यात आली आहे. हिरकणी, आशियाड, रातराणी यांसारख्या केवळ एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चालकाच्या मागे व त्याच दिशेने अखेरच्या आसनाजवळ अशा दोन आपत्कालीन खिडक्या आहेत. स्टिंग ऑपरेशनदरम्यान लोकमत चमूने नव्या व जुन्या बसस्थानकांसह दोन्ही आगारात उभ्या असलेल्या बसगाड्यांच्या आपत्कालीन खिडक्यांची उघड-झाप होते की नाही, याची चाचपणी केली. ज्यामध्ये जुन्या बसगाड्यांचे संकटकालीन दरवाजे देखभाल व दुरुस्तीअभावी जाम (उघडेनासे) झाले असल्याचे वास्तव समोर आले. दुर्दैवाने अपघात घडल्यास, ज्यांची अकारण कधीच उघडझाप होत नाही, असे आपत्कालीन दरवाजे प्रवाशांकरिता आफत ठरणार असल्याचे धडधडीत वास्तव समोर आले आहे. ताफ्यात नव्याने दाखल होणर्‍या प्रत्येक बसला दोन आपत्कालीन दरवाजे लावण्याचा निर्णय मुळीच चुकीचा नाही; मात्र जुन्या बसगाड्यांच्या आपत्कालीन दरवाजांना नियमित ऑइलिंग, ग्रिसिंग होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र शासनाने लागू केलेल्या ह्यएआयएस-५२ह्ण(ऑटोमोबाइल इंडियन स्टँडर्ड-५२) या नियमानुसार आता ह्यएसटीह्णची बांधणी केली जात आहे. या नव्या नियमानुसार बसची बांधणी करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे बसची बांधणी अधिक मजबूत होणार हे निश्‍चित; मात्र सध्याच्या घडीला विभागातील ज्या गाड्या भंगार अवस्थेत धावत आहेत, त्यांमध्ये प्रवास करणार्‍यांच्या जिवाला घोर लाणार, हे ही तितकेच खरे!