शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या वाहकांना अग्रधनापोटीही सुटे पैसे नाहीच!

By admin | Updated: April 26, 2016 02:06 IST

सुट्या पैशांची डोकेदुखी : प्रवासी व वाहकांचे उडताहेत खटके.

राम देशपांडे /अकोलाप्रवासादरम्यान वाहकाजवळ सुटे पैसे असावेत म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने कर्तव्यावर जाणार्‍या प्रत्येक वाहकाला ह्यअग्रधनह्ण म्हणून १00 रुपये दिले जातात. वास्तविक पाहता प्रशासनाने हे अग्रधन सुट्या पैशाच्या स्वरूपात देणे अपेक्षित आहे; मात्र महामंडळाला कायम सुट्या पैशांची चणचण भासत असल्याने, १00 रुपयांच्या नोटा देऊन वाहकांची बोळवण केली जाते. परिणामी प्रवासादरम्यान प्रवासी आणि वाहकांमध्ये खटके उडतात. ज्या बँकांमध्ये दिवसभराचे लाखोचे उत्पन्न जमा केले जाते, त्या बँकासुद्धा महामंडळाला सुटे पैसे देण्यास असर्मथ ठरत असल्याचे चित्र रापमच्या अमरावती परिमंडळात पाहावयास मिळत आहे. घरातून बाहेर पडताना अनेक जण खिशात थोडेफार सुटे पैसे बाळगतात. नसल्यास, ही कमतरता अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळी भरून काढतात. याच प्रथेला अनुसरून, कर्तव्यावर निघालेल्या वाहकांना एसटी महामंडळाकडून ह्यअग्रधनह्ण म्हणून प्रत्येकी शंभर रुपये दिले जातात. प्रवासभाडे आकारताना वाहकास सुट्या पैशांची अडचण भासू नये, याकरिता एसटी महामंडळाने ही प्रथा सुरू केली. पूर्वी प्रत्येक वाहकास सुट्या पैशांच्या स्वरूपात १0 रुपये दिले जायचे. काळानुरूप बदल करून प्रत्येक वाहकास महामंडळाकडून १00 रुपये दिले जातात. वास्तविक पाहता, एसटी महामंडळाने ही रक्कम प्रत्येक वाहकास सुट्या पैशांच्या स्वरूपातच देणे अपेक्षित आहे; मात्र सुट्या पैशांची चणचण हा कळीचा मुद्दा ठरत असल्याने, शंभराची नोट देऊन प्रत्येक वाहकाची बोळवण केली जात आहे. परिणामी प्रवासादरम्यान प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्या पैशांवरून वाद निर्माण होत आहेत.