शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
4
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
5
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
6
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
7
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
8
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
9
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
10
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
11
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
12
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
13
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
14
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
15
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
16
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
18
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
19
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
20
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू

खमंग झुणक्याला महागाईची फोडणी!

By admin | Updated: April 12, 2016 02:07 IST

भजे, आलूवड्याचेही भाव वधारले; हरभ-याचे उत्पादन घटल्याचा परिणाम.

अकोला: भाकरीबरोबर चवीने खाल्ल्या जाणारा झुणकाही महागाईच्या फोडणीमुळे गोरगरिबांच्या आवाक्यात राहिलेला नाही. हरभर्‍याचे उत्पादन घटल्याने हरभर्‍याच्या डाळीसह बेसनाचे दर मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. मागील काही वर्षांत हरभरा बेसनाच्या भावाने आठवडाभरात उच्चांक गाठला आहे. त्यामुळे खमंग झुणक्यासोबतच चवदार भजे, आलुवड्यांनासुद्धा महागाईची झळ बसू लागली आहे. गत दोन वर्षांपासून रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या लागवडीच्या काळात पावसाने दडी मारली होती. त्याचा फटका हरभरा पिकाला बसला आणि हरभर्‍याचे उत्पादन घटले. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात बाजारात हरभरा दाखल होतो. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच मागणीच्या तुलनेत हरभर्‍याची आवक कमी झाली. परिणामी हरभर्‍याचे भाव वाढले. सोमवारी घाऊक बाजारात हरभर्‍याला क्विंटलमागे ४३00 ते ४७७५ रुपये भाव मिळाला. अमरावती विभागात दरवर्षी हरभरा पिकाचे उत्पादन समाधारक होते; परंतु गत दोन वर्षांपासून अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्हय़ात हरभरा पिकाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजारातील आवक तुलनेने कमी झाली. त्याचा परिणाम भाववाढीवर होत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभर्‍याला प्रतिक्विंटल ४६७५ रुपये सरासरी भाव मिळत आहे. हरभरा महागल्याने डाळ आणि बेसनावरही विपरीत परिणाम झाला आहे. शनिवारी हरभरा डाळीचे भाव क्लिंटलमागे ६४ ते ७0 रुपयांपर्यंत पोहोचले, तर आठवडाभरात बेसनाच्या भावाने ५0 किलोमागे ३४४0 ते ३८७0 रुपयांपर्यंत मजल मारली. किराणा बाजारामध्ये बेसनाचे भाव प्रतिकिलोमागे ९२ रूपये आहे.