शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरी घोटाळ्याची ‘ऑन द स्पॉट’ चौकशी सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:12 IST

घोटाळ्यासाठी जबाबदार धरून तत्कालीन अधिकारी-कर्मचाºयांना १ ते ४ मुद्यांचे स्पष्टीकरण मागविणारे दोषारोपपत्र बजाविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : धडक सिंचन विहिरी योजनेच्या लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना मंजुरी दिल्याप्र्रकरणी ग्रामपंचायतनिहाय संपूर्ण माहिती सादर करण्याचा आदेश शासनाने दिल्यानंतर त्या दोन्ही तालुक्यांतील विहिरी वाटपाची ‘ऑन द स्पॉट’ चौकशी सुरू झाली आहे. प्रत्येक शेतात जाऊन विहिरींची पडताळणी केली जात आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी लाखो रुपयांचा मलिदा लाटणाऱ्या बाळापूर, पातूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकाऱ्यांसह एकूण ५१ जणांवर दोषारोपपत्र बजावण्यात आले. त्यांच्या स्पष्टीकरणाबाबतही अनभिज्ञता व्यक्त केली जात आहे.बाळापूर तालुक्यात सिंचन विहिरींसाठी ६४५ लक्ष्यांक असताना ९२४ लाभार्थींना मंजुरी आदेश देण्यात आला. पातूर तालुक्यातही तोच प्रकार घडल्याचे पुढे आले. अनेक गावांतील लक्ष्यांकाची पूर्तीही झाली नाही. त्यामुळे लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी देणारे तत्कालीन गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले होते. चौकशी अहवालानंतर त्यामध्ये सहभाग असणाºया अधिकारी-कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. त्यानंतर या घोटाळ्यासाठी जबाबदार धरून तत्कालीन अधिकारी-कर्मचाºयांना १ ते ४ मुद्यांचे स्पष्टीकरण मागविणारे दोषारोपपत्र बजाविण्यात आले. त्यामध्ये बाळापूर, पातूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी असे प्रत्येकी पाच अधिकारी, तर ग्रामसेवकांमध्ये अनुक्रमे २३ आणि १८ जणांचा समावेश आहे. त्या सर्वांना दोषारोपपत्र बजाविण्यात आले. त्यानंतर विहिरींची संपूर्ण माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने मागविली. तसेच या घोटाळ्याचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनातही उपस्थित झाल्याने विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र पथकांमार्फत या विहिरींच्या चौकशीचा अहवाल मागविला. त्यासाठी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर जबाबदारी देण्यात आली. अभियंते प्रत्येक शेतात जाऊन विहिरींच्या सद्यस्थितीची माहिती घेत पडताळणी अहवाल तयार करीत आहेत. हा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही आधीच दोन्ही तालुक्यांतील लाभार्थींच्या संपूर्ण माहितीसह शेती, योजनेंसदर्भातील २० मुद्यांची माहिती मागविली होती. ती प्राप्त झालेली नाही. त्यानंतर आता पडताळणी अहवालच तयार केला जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद