शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंना मिळणार क्रीडा सवलतीचे वाढीव गुण

By admin | Updated: April 27, 2017 01:13 IST

अकोला : एकविध खेळ क्रीडा संघटनेमार्फत झालेल्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येणार आहे.

अकोला : एकविध खेळ क्रीडा संघटनेमार्फत झालेल्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त सहभागी झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा सन २०१६-१७ मध्ये प्रविष्ट झालेल्या नियमित खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येणार आहे.यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी २५ एप्रिल रोजी क्रीडा सवलतीचे गुण ज्या खेळ प्रकारांना मिळणार आहे, अशा खेळ क्रीडा संघटनेची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारतीय आॅलिम्पिक असोसिएशनशी संलग्न एकविध खेळ संघटना एकूण ३१ आहेत, तसेच महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनशी संलग्न एकविध खेळ संघटनादेखील ३१ आहेत.यामध्ये आर्चरी, अ‍ॅथलेक्सि, अ‍ॅक्वाटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॅण्डबॉल ज्युडो, कबड्डी, खो-खो, लॉन टेनिस, रायफल, टेबल-टेनिस, ट्रायथलॉन, तायकांदो, व्हॉलीबॉल, रेसलिंग, वेटलिफ्टिंग, कयाकिंग अ‍ॅण्ड कॅनोईग, फेन्सिंग, वुशू, मॉडर्न पेटॅथलॉन, इक्वेस्टेरियन, नेटबॉल, रग्बी, स्क्वॅश,रोइंग, स्क्वॅश रॅकेटस, स्वीमिंग, टेनिस, हॉकी या खेळांचा समावेश आहे. या खेळांमध्ये प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना क्रीडा सवलतीचे गुण देण्यात येणार आहे.क्रीडा सवलतीच्या गुणांचा लाभ खेळाडू विद्यार्थ्यांना होण्याकरिता जिल्ह्यातील विद्यालय-महाविद्यालयाचे प्राचार्य-मुख्याध्यापक यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे तत्काळ सादर करणे आवश्यक आहे.- शेखर पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी.