अकोला : युवकांचे हक्काचे व्यासपीठ लोकमत युवा नेक्स्ट व श्री शिवाजी महाविद्यालय यांच्यातर्फे विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वशैलीला वाव देण्याच्या उद्देशाने ह्यवॉर ऑफ दी वर्ड्सह्ण या वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकमत युवा नेक्स्ट आणि श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी आयोजित या वादविवाद स्पध्रेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात पार पडलेल्या या स्पध्रेचे शुभारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एस. पी. देशमुख होते. प्रा. डॉ. एम. आर. इंगळे व प्रा. ए. एम. राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रा. एस. पी. देशमुख अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, युवा नेक्स्ट आयोजित करीत असलेले सर्व उपक्रम हे युवकांना प्रेरणादायी असून, या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांंनी अशा स्पध्रेत सहभाग घेत या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केले. स्पर्धेचे संचलन शुभांगी वानखडे व आभार प्रदर्शन प्रशांत पाटील यांनी केले.
‘वॉर ऑफ दी वर्डस्’ वादविवाद स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: December 24, 2014 01:26 IST