शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उद्योग निर्माण करण्यावर ‘आत्मा’चा भर!

By admin | Updated: December 16, 2014 00:57 IST

उद्योग उभारणीसाठी शेतक-यांना मिळणार अर्थसहाय्य

अकोला : शेतकर्‍यांमधून कृषी उद्योजक निर्माण करण्यावर कृषी तंत्रज्ञान व्यवसाय यंत्रणेने (आत्मा) भर दिला असून, कृषी उद्योग टाकण्यासाठी शेतकर्‍यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे.राज्यातह्यआत्माह्णकडून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. पीक उत्पादन आणि उत्पादकता वाढ व वाढीव बाजाराच्या संधी, हे या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट आहे. याच प्रकल्पाच्या माध्यमातून २0१४-१५ मध्ये कृषी उद्योजकता विकास योजना सुरू करण्यात आली आहे. या विकास कार्यक्रमांतर्गत कृषी उद्योजक गट, या प्रकल्पांतर्गत कार्यक्षेत्रातील शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना या योजनेतून कृषी उद्योग प्रकल्प सुरू करता येणार आहेत. या गट, कंपन्या आणि संस्थांना काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व्यवस्थापन, धान्य व फळेविषयक प्रकल्प, मूल्यवर्धन व प्रक्रिया, प्रतवारी व पणन प्रकल्प, कृषी मूल्यवर्धन यांत्रिकीकरण प्रकल्प, कृषी व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम, बाजाराभिमुख सेंद्रिय कृषी उत्पादन, प्रतवारी व पणन प्रोत्साहन प्रकल्प, या विविध प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाकरिता अहवाल व प्रस्ताव तयार करण्याची गरज असून, या कृषी उद्योजकता प्रस्तावातील उभारणीसाठी लागणार्‍या केवळ मशिनरी व उपकरणांनाच अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मशिनरी व उपकरणे यावरील खर्चाच्या ५0 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख एवढे अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पाला कि मान सहा वर्ष यशस्विरीत्या चालविणे बंधनकारक आहे. गट, संस्था आणि कंपनी असलेल्या लाभार्थींनी या प्रकल्पांना पूर्वसंमती मिळावी यासाठी अर्ज करावे लागणार आहेत. हे अर्ज प्रकल्प संचालक , आत्मा कार्यालय, अकोला येथे उपलब्ध आहेत.