शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्टय़ात टँकरद्वारे पाणीपुरवठय़ासाठी दरमहा होणार  अडीच कोटी खर्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:21 IST

अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला  आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठय़ासाठी दरमहा अडीच कोटी रु पयांचा खर्च होणार आहे.

ठळक मुद्दे६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठापाच शासकीय, ४0 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला  आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठय़ासाठी दरमहा अडीच कोटी रु पयांचा खर्च होणार आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी  उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, अकोला  शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४  गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा  धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद  करण्यात आला आहे. खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ  दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई  बंधार्‍यातील पाणी संपल्याने योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा  गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला. त्यामुळे योजनेंतर्ग त गावांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण आहे.  त्यानुषंगाने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत  पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू  करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी ७ सप्टेंबर रोजी दिला.  त्यानुसार १0 सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू  करण्यात आला आहे. ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत  अकोट आणि देवरी फाटा येथील जमिनीखालील पाण्याच्या  टाकीतून ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला आहे. अकोट आणि देवरी फाटा येथून या गावांना ४५  टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी वाहतूक खर्च आणि  टँकर भाड्यापोटी दरमहा २ कोटी ५0 लाख रुपयांचा खर्च  होणार आहे. हा खर्च भागविण्यासाठी टंचाई अंतर्गत  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे निधीची मागणी  करण्यात येणार आहे.

पाच शासकीय, ४0 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा!पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू  करण्यात आला. त्यामध्ये पाच शासकीय टँकर आणि ४0  खासगी टँकरचा समावेश आहे. ४0 खासगी टँकरद्वारे भाडे तत्त्वावर पाणीपुरवठा करण्यासाठी  हैदराबाद येथील एका  निविदाधारकासोबत जिल्हा प्रशासनामार्फत करारनामा  करण्यात आला आहे. त्यानुसार पाणीटंचाई संपुष्टात येईपर्यंंंत  संबंधित गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.