शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेडमधील हॉटेलवर विशेष पथकाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 01:20 IST

हॉटेल मालक ताब्यात, ४.५० लाखांच्या मुद्देमालासह दारू जप्त

अकोला : अकोट ते हिवरखेड रोडवर असलेल्या राही हॉटेलवर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी शुक्रवारी दुपारी छापा टाकला. या हॉटेलमधून अवैधरीत्या विक्री करण्यात येत असलेल्या देशी-विदेशी दारूसह तब्बल ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हॉटेलचे मालक अकोला येथील रहिवासी सचिन उमाळे याच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अकोट ते हिवरखेड रोडवरील अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल राहीमधून देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह या हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलची झाडाझडती घेतल्यानंतर देशी आणि विदेशी दारूच्या साठ्यासह ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. यासोबतच हॉटेलचा मालक अकोला येथील रहिवासी सचिन रामकृष्ण उमाळे आणि त्याचे साथीदार मुकुंद रामराव वानखडे, रा. तुरखेड अमरावती, जगदीश प्यारेलाल जयस्वाल रा. खापरखेडा अमरावती, प्रमोद प्रभुदास ठाकरे रा. कारला अमरावती आणि अशोक साहेबराव गहले रा. देऊळगाव अकोट या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मीणा यांच्या पथकाचे प्रमुख असलेले सहायक पोलीस निरीक्षक अळसपुरे यांची आजपर्यंतची देशी आणि विदेशी दारूवरील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी त्यांच्या पथकासह केली. पोलिसांच्या पार्टीसाठी होता दारूचा साठाहॉटेल राही येथे अकोट ग्रामीण आणि अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांच्या पार्टीसाठीच हा दारूचा साठा ठेवल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे; मात्र विशेष पथकाने पार्टी सुरू होण्याच्या आधीच गोपनीय माहितीवरून ही कारवाई केल्याने पोलिसांच्या पार्टीवर विरजन पडले. छापा टाकल्यानंतर रेफ्रिजेरेटरभर दारूच्या बॉटल आढळून आल्या. २५ ते ३० पोलिसांची या ठिकाणी पार्टी आयोजित होती आणि त्यासाठीच हा दारूचा साठा ठेवल्याची माहिती हॉटेलमधीलच एकाने घटनास्थळावर दिली.