शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पथकाचा अवैध धंद्यांवर वचक!

By admin | Updated: May 3, 2017 01:02 IST

दोन महिन्यांमध्ये १४२ आरोपींना अटक: ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला : पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनातील विशेष पोलीस पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर छापे घालून एकप्रकारचा वचक निर्माण केला. दोन महिन्यांमध्ये अवैध दारू विक्री, वरली जुगारावर छापे घालून विशेष पोलीस पथकाने १४२ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या सातत्याच्या छाप्यांमुळे अवैध धंद्यांना आळा बसला आहे. मावळते पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी ५ मार्च रोजी जुने शहरचे सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांच्याकडे विशेष पथकाची जबाबदारी सोपविली. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व एपीआय अळसपुरे यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्ये करणाऱ्यांविरुद्ध धडाकेबाज कारवाया करून जरब बसविली. मार्च व एप्रिल माहिन्यामध्ये विशेष पथकाने बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर, रामदासपेठ, सिव्हिल लाइन, एमआयडीसी, अकोट यासह इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर छापे घालून १ एप्रिल २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ या अकरा महिन्यांमध्ये जुगारांच्या छाप्यामधून ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मार्च व एप्रिल २०१७ या दोन महिन्यांमध्ये अकरा महिन्यांच्या तुलनेत जवळपास पाचपट १७ लाख १० हजार ७३५ रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. मार्च व एप्रिल २०१७ या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १३२ जणांना जुगार कारवायांमध्ये अटक केली, तसेच मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत अकोला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर एकूण सहा गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून एकूण २० लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एवढेच नाही, तर विशेष पोलीस पथकाने जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई २९ एप्रिल रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोनिका रेस्टॉरंटवर करून एकूण १० लाख ८९ हजार रुपये किमतीची देशी व विदेशी दारू आणि ३ लाख ३० हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली होती. यासोबतच विशेष पथकाने ६ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील शिवणी परिसरातून १३ लाख ५० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखासुद्धा जप्त केला होता. पोलीस अधीक्षकांच्या सातत्यपूर्ण छाप्यांमुळे अवैध धंदेवाइकांमध्ये चांगलीच जरब बसली असून, अनेकांनी अवैध धंदे बंद केले आहेत.