शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी आले विशेष विमान!

By admin | Updated: October 21, 2014 00:32 IST

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार मुंबईला रवाना.

अकोला : विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यात सत्ता स्थापण्याची प्रथम संधी मिळणार आहे. त्या अनुषंगाने मुंबई येथे होणार्‍या भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहता यावे यासाठी जिलतील नवनिर्वाचित आमदारांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी सोमवारी विशेष विमान अकोल्यात आले होते. या विमानाने जिलतील चार आमदारांसह बुलडाणा व वाशिम जिलतील भाजपचे नवनिर्वाचित मुंबईला रवाना झालेत. सत्ता स्थापनाच्या दृष्टिकोणातून विचारविनिमय करण्यासाठी भाजपची महत्त्वाची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील भाजपच्या आमदारांना तातडीने बोलावण्यात आले आहे. त्यांना वेळेत मुंबईला पोहोचता यावे यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. हे विमान सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास शिवणी विमानतळावर पोहोचले. त्यानंतर अकोला, वाशिम व बुलडाणा जिलंतील भाजपचे नवनिर्वाचित आमदारांना घेऊन विमान मुंबईकडे रवाना झाले. पहिल्या विमानाने खासदार संजय धोत्रे, भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, वाशिमचे आमदार लखन मलिक हे मुंबईकडे रवाना झालेत. दुसर्‍या विमानात आ. रणधीर सावरकर, खामगावचे आमदार आशीष पुंडकर, आ. संजय कुटे, आ. डॉ. रणजित पाटील यांच्यासह विदर्भ चेंबरचे अशोक गुप्ता, वसंत बाछुका, अशोक दालमिया मुंबईला रवाना झालेत.यावेळी विमानतळावर जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, डॉ. अशोक ओळंबे, महापौर उज्ज्वला देशमुख, विजय अग्रवाल, किशोर मांगटे, प्रवीण सावरकर, सागर शेगोकार, जयंत मसने, अँड. सुभाष ठाकूर, रावसाहेब कांबे, मनोज तायडे, संतोष झुनझुनवाला, ज्ञानेश्‍वर पोटे, बाळ टाले, हरिभाऊ काळे, गणेश पोटे, गिरीश गोखले, पवन पाडिया, छोटू गावंडे, उदय देशमुख, विलास शेळके, भानुदास येण्णावार, गिरीश जोशी, अंबादास उमाळे, राजेश्‍वरी शर्मा, गजानन लोणकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.