शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

सोयाबीनच्या दरात चढ-उतार!

By admin | Updated: September 21, 2016 02:07 IST

मंगळवारी दोनशे रुपयांनी दरवाढ, गव्हाचे दर पाचशे रुपयांनी घसरले.

अकोला, दि. २0 - सोयबीन काढणी हंगाम तोंडावर आला असताना मागील आठवड्यापासून सोयाबीनचे दर घसरले आहेत; पण २0 सप्टेंबर रोजी या दरात किंचितशी सुधारणा झाली असून, जास्तीत जास्त ३,३00 तर सरासरी दर हे ३,१९0 रुपये झाले. यावर्षी पाऊस वेळेवर आल्याने शेतकर्‍यांनी या दोन्ही पिकांची पेरणी केली; पण काढणी हंगाम सुरू होताच मुगाचे दर कोसळले आहेत. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाला सध्या सरासरी ४,६२५ रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. मुगापेक्षा उडिदाची पेरणी कमी आहे. त्यामुळे उडिदाचे प्रतिक्विंटल दर हे सरासरी ६,८00 रुपये आहेत. हे दर १00 रुपयांनी कमी झाले आहेत. यावर्षी सोयाबीनची पेरणी मोठय़ा प्रमाणात झाली आहे; पण काढणी हंगाम जवळ येताच बाजारात मात्र दर कोसळले होते. हे दर २,८00 रुपयांपर्यंंंंत खाली आले होते. मंगळवारी या दरात सुधारणा झाली असून, सोयाबीनला प्रतिक्विंटल कमीत कमी ३,0७५ जास्तीत जास्त ३,३00 तर सरासरी दर हे ३,१९0 रुपये आहेत. हरभर्‍याचा हंगाम आणखी चार ते पाच महिने पुढे आहे. मागील आठवड्यात हरभर्‍याचे सरासरी दर प्रतिक्विंटल आठ हजारांपर्यंंंत पोहोचले होते. आजमितीस हे दर ५00 रुपयांनी घसरले असून, ७,५00 रुपये प्रतिक्विंटल आहेत. तुरीचे दर सध्या कमीत कमी सहा हजार, जास्तीत जास्त ६,७५0 तर सरासरी ६,३७५ रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत. ज्वारीला कमीत कमी १,४२५ जास्तीत जास्त १,५00 तर सरासरी दर हे प्रतिक्विंटल १,४६0 रुपये आहेत. गहू धान्याचे दर सरासरी १,५00 रुपये प्रतिक्विंटल असून, कमीत कमी १,५00 तर जास्तीत जास्त १,५00 रुपये आहेत. धान्याची आवकअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी सर्वाधिक १,७३५ क्विंटल मुगाची आवक होती, तर उडीद १,७0१ क्विंटल विक्रीस आला. तूर १२९ क्विंटल, सोयाबीन १६0 क्विंटल तसेच हरबरा ७९ क्विंटल, गहू १0 तर ज्वारी ११ क्विंटल विक्रीस आली होती.