शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे भाव पडलेलेच !

By admin | Updated: December 31, 2014 00:52 IST

सोयाबीनचा हमीदर २५६0 रुपयांवर स्थिर.

अकोला : सतत दोन वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांच्या हाती निराशा आली असून, बाजारातील किमती आणि सोयाबीनचा उतारा कमी झाल्याने उत्पादनखर्चही निघणे कठीण झाले. या परिस्थितीत हमीभाव तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावात यावर्षी वाढ झाली नसून, बाजारात सोयाबीनचे भाव अद्याप वाढले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गतवर्षीच्या अतवृष्टीने सोयाबीन पीक हातचे गेले. यावर्षी पाऊसच नसल्याने त्याचा फटका सोयाबीनला बसला आहे. गतवर्षी सोयाबीन काळे पडल्याने यावर्षी बियाण्यांसाठी शेतकर्‍यांना संघर्ष करावा लागला. बियाणे मिळाले; परंतु हजारो हेक्टरवरील बियाणे वांझ निघाल्याने शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. कीटकनाशके फवारण्याचा अतिरिक्त खर्च वाढला. त्या तुलनेत उत्पादन झाले नाही. उत्पादनखर्च तरी निघेल, या अपेक्षेत शेतकरी असताना खासगी बाजारात सोयाबीनचे प्रतिक्विंटल भाव २५00 ते ३000 च्या वर सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी पाऊस नसल्याने सोयाबीन परिपक्वतेपूर्वीच वाळले. त्यामुळे शेंगांची वाढ खुंटली होती. हाच धागा धरू न शेतकर्‍यांच्या सोयाबीनची बाजारात लूट सुरू आहे. एकीकडे सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे बाजारात भाव पडले आहेत. या चक्रामुळे शेतकरी संभ्रमात सापडला आहे. सतत दोन वर्षांच्या नुकसानामुळे यावर्षी सोयाबीन घरी साठवून ठेवण्याइतपत आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकर्‍यांनी शेतात काढलेले सोयाबीन थेट बाजारातच आणले. हमीभावाने मात्र शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. गतवर्षीपर्यंत सोयाबीनच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे; परंतु यावर्षी वाढच झाली नसल्याने सोयाबीनचे प्रतिक्विंटल हमीदर २५६0 रुपयांवर स्थिरावले आहेत. त्याचा फटका शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. हमीभाव कमी असल्यामुळे व्यापारीही कमी भावातच सोयाबिनची खरेदी करीत आहे. परिणामी शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे.