शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन अनुदानाच्या अर्जाची पडताळणी संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 02:49 IST

पश्‍चिम व-हाडातील अनेक शेतकर्‍यांचे अर्ज बाजार समित्यांमध्येच.

वाशिम, दि. १0- सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यासाठी पश्‍चिम वर्‍हाडातील तीन जिल्ह्यांत मिळून १ लाख ४८ हजारांवर शेतकर्‍यांनी बाजार समित्यांकडे अर्ज सादर केले आहेत. बाजार समित्यानंतर तालुका सहनिबंधकांच्या पडताळणीनंतर हे अर्ज जिल्हा उपनिबंधकांमार्फत २३ फेब्रुवारीपर्यंत शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे; मात्र अद्याप या अर्जांची तालुका स्तरावरील पडताळणीच पूर्ण झालेली नाही. यंदा १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरदरम्यान बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रतिशेतकरी जास्तीत जास्त २५ क्विंटल याप्रमाणे पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. पणन संचालकांनी याबाबत सर्व बाजार समित्यांना परिपत्रकीय सूचना दिलेल्या आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी सोयाबीन विक्रीपट्टीसह आपला सात-बारा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांकासह सोयाबीन विक्री केलेल्या संबंधित बाजार समितीकडे अर्ज करावयाचे होते. या योजनेचा लाभ शेतकर्‍यांना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार केल्यानंतर तालुका सहायक निबंधकांनी प्रस्ताव तपासून जिल्हा उपनिबंधकांना द्यावयाचे आहेत. बाजार समित्यांमध्ये आवक होऊन विक्री झालेल्या सोयाबीनलाच अनुदान दिले जाणार आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला जिल्ह्यातून २८५६१, बुलडाणा जिल्ह्यातून ६५९४१, तर वाशिम जिल्ह्यातून ५३९६१ शेतकर्‍यांनी बाजार समित्यांकडे अर्ज सादर केले आहेत. तालुका सहायक निबंधकांनी हे अर्ज १५ फेब्रुवारीपर्यंत पाठविणे आवश्यक असताना, अद्याप अनेक प्रस्ताव तालुका सहनिबंधकांकडेच सादर करण्यात आले नसल्याची माहिती आहे. शेतकर्‍यांच्या अर्जाची छाननी करून त्यांची संगणकीय नोंद करावी लागणार आहे. आमच्याकडे आलेल्या १६५ हजार अर्जांचा विचार करता ही प्रक्रिया सोपी नाही; परंतु आम्ही १५ फेब्रुवारीपूर्वी हे प्रस्ताव सहनिबंधकांमार्फ त जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्याचा प्रयत्न करणार आहोत.-सुनील मालोकार,सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला. शेतकर्‍यांच्या सोयाबीन अनुदानाचे प्रस्ताव अद्याप तालुका सहनिबंधकांकडून आमच्याकडे आले नाहीत. ते प्रस्ताव आल्यानंतर शक्य तेवढय़ा लवकर शासनाकडे सादर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. -ज्ञानेश्‍वर खाडे, जिल्हा उपनिबंधक, वाशिम.