शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाडी अदमपूर येथे सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:23 IST

तेल्हारा : तालुक्यातील वाडी आदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे या शेतकऱ्याने शहरातील एका कृषी सेवा केंद्रातून सोयाबीनचे बियाणे विकत ...

तेल्हारा : तालुक्यातील वाडी आदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे या शेतकऱ्याने शहरातील एका कृषी सेवा केंद्रातून सोयाबीनचे बियाणे विकत घेऊन पेरणी केली. मात्र, सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तालुक्यातील वाडी अदमपूर येथील गोपाल शांताराम चितोडे यांचे वाडी अहमदपूर शेतशिवारात १ हेक्टर ९६ आर शेती आहे. त्यासाठी त्यांनी तेल्हारा येथील एका कृषी केंद्रातून दि.४ जून २०२१ रोजी पाच बॅग बियाणे खरेदी केले. पेरणीनंतर त्यांनी शेताचे निरीक्षण केले असता एक बॅग ज्या शेतात पेरली तिला शेंगांची संख्या भरपूर आहे. मात्र, चार बॅग बोगस असल्याने शेंगाच नसल्याचा आरोप शेतकऱ्याने तक्रारीतून केला आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन मदत करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. त्यांनी अर्जाच्या प्रतिलिपी तालुका कृषी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अकोला यांच्याकडे दिल्या आहेत.

----------

तक्रारीवर तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती पिकाची पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला जाईल. -भरत चव्हाण, गटविकास अधिकारी तथा कृषी अधिकारी पंचायत समिती तेल्हारा