शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन-कपाशी पीक विम्याचे १0 कोटी गेले परत!

By admin | Updated: April 1, 2017 02:54 IST

जिल्हय़ातील शेतक-यांना पीक विमा रकमेच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

संतोष येलकर अकोला, दि. ३१- गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा न काढलेल्या जिल्हय़ातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांना पीक विम्याच्या ५0 टक्के पीक नुकसानभरपाईची रक्कम देण्यासाठी शासनामार्फत प्राप्त झालेल्या ६0 कोटी ३७ लाख ६२ हजार रुपयांच्या मदत निधीपैकी अखर्चित ९ कोटी ६३ लाख १७ हजार रुपयांचा निधी ३१ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे परत करण्यात आला. अखर्चित निधी शासन खात्यात जमा करण्यात आल्याने, जिल्हय़ातील शेतकर्‍यांना पीक विमा रकमेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. नापिकीमुळे जिल्हय़ातील शेतकरी हवालदिल झाला होता. या पृष्ठभूमीवर सन २0१५ च्या खरीप हंगामात पीक विमा न काढलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंंत पीक विम्याच्या ५0 टक्के पीक नुकसानभरपाईची मदत वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. सन २0१५ च्या खरीप हंगामात जिल्हय़ात १ लाख ५७ हजार १0२ शेतकर्‍यांनी १ लाख ४८ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढला नसून, तीन तालुक्यांत १२ हजार ८५२ शेतकर्‍यांनी १३ हजार ४५८ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाचा विमा काढला नाही. त्यानुसार गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा न काढलेल्या जिल्हय़ातील सोयाबीन व कापूस उत्पादक १ लाख ६९ हजार ९५४ शेतकर्‍यांना पीक विम्याच्या ५0 टक्के मदत वाटपासाठी ६0 कोटी ३७ लाख ६२ हजार ६५८ रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत गत ११ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १२ जानेवारी रोजी जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला होता. मागणीनंतर परत मिळणार मदतनिधी!सोयाबीन व कापूस पीक विमा न काढलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना पीक विम्याच्या ५0 टक्के रकमेची मदत देण्यासाठी उपलब्ध निधीपैकी अखर्चित राहिलेला निधी शासनाकडे परत करण्यात आला आहे. शासनाकडे परत करण्यात आलेला निधी परत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे मागणी केली जाणार आहे. त्यानुसार परत गेलेल्या पीक विम्याचा निधी परत मिळणार आहे; मात्र निधी उपलब्ध होईपर्यंंत जिल्हय़ातील शेतकर्‍यांना पीक विमा रकमेच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.