शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, कपाशी धोक्यात

By admin | Updated: September 1, 2014 21:37 IST

अकोला तालुक्यातील ९६ हजार हेक्टरवरील पिकांवर रोगराई पसरल्यामुळे बळीराज संकटात सापडला असून, मोठय़ा प्रमाणात उत्पन्नात घट येण्याची चिन्हे दिसत आहेत.

बाभूळगाव जहाँ. : अकोला तालुक्यातील ९६ हजार हेक्टरवरील पिकांवर रोगराई पसरल्यामुळे बळीराज संकटात सापडला असून, मोठय़ा प्रमाणात उत्पन्नात घट येण्याची चिन्हे दिसत आहेत. कपाशी व सोयाबीन या मुख्य पिकांवर हा आजार आल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन व पर्‍हाटीची जास्त प्रमाणात पेरणी केली आहे; परंतु कपाशीवर कोकडा तर सोयाबीन पिवळे पडत असल्यामुळे हाताशी आलेले पीक जाते की काय, या भीतीने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश पिकांची स्थिती चांगली आहे. उडीद आणि मूग पीक शेतकर्‍यांच्या हातून आधीच गेलेले आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट हे कपाशी, तूर आणि सोयाबीनवर अवलंबून होते. शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केल्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्याखाली आहेत; परंतु कोकडा व सोयाबीन पिवळे पडत असल्याने या पिकांच्या उत्पन्नात घट येणार आहे. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, वाशिंबा, बाभूळगाव, डोंगरगाव, मासा, शिसा, बोंदरखेड, अन्वी मिर्झापूर, आपातापा, म्हैसांग या परिसरातील पिके या रोगराईच्या विळख्यात सापडली आहेत. विविध पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. आधीच सोयाबीनची उगवणक्षमता कमी असल्यामुळे शेतकरी चिंतेत असताना या नव्या रोगराईच्या संकटामुळे शेतकरी खचून गेला आहे. शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यानंतर शासन स्तरावर मदतीची घोषणा करण्यात येते; परंतु ही मदत तुटपुंजी असल्यामुळे शेतकर्‍यांना या मदतीचा कधीच फायदा होत नाही. कृषी विभागाच्यावतीने शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन कक्ष सुरू करावे व गावागावांत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केल्यास काही प्रमाणात पिकांचा बचाव होऊ शकतो, असे मत येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत.