शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र पोहोचले ६६ टक्क्यांवर!

By admin | Updated: July 6, 2016 01:22 IST

पश्‍चिम विदर्भात ८ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कापसाचे क्षेत्र मात्र घटले.

अकोला: पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक स्वरू पाच्या पावसाला सुरुवात झाल्याने पेरणीची गती वाढली असून, ५ जुलैपर्यंत ७0 टक्क्यांपर्यंत पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ६६ टक्के म्हणजे ८ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कापूस या नगदी पिकाचे क्षेत्र मात्र घटले आहे; परंतु यवतमाळ या एका जिल्हय़ात कापसाचे क्षेत्र वाढले आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पेरणीलायक क्षेत्र ३२ लाख ७५ हजार २00 हेक्टर आहे, मागील आठवड्यापासून बर्‍यापैकी पाऊस होत असल्याने पेरणीला वेग आला आहे. कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरू न यावर्षीही सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे चित्र आहे. सोयबीन ८ लाख ३४ हजार ६00 तर कापूस केवळ ५८ टक्के म्हणजे ६ लाख ३५ हजार ६00 हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार १00 हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. उर्वरित जिल्हय़ात मात्र सोयाबीन आघाडीवर आहे.कापूस हे विदर्भाचे नगदी पीक; परंतु उत्पादनावर आधारित दर मिळत नसल्याने अलीकडच्या दहा वर्षात हे पीक मागे पडले असून, याची जागा सोयाबीनने घेतली आहे. यावर्षी ५ जुलैपर्यंंत बुलडणा जिल्हय़ात २ लाख ७ हजार ३00 हेक्टरवर सोयाबीन तर ८८ हजार हेक्टरवर कापसाची पेरणी शेतकर्‍यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यात ८६ हजार ३00 हेक्टर सोयबीन तर कापूस ४२ हजार ७00 हेक्टर, वाशिम सोयाबीन १ लाख ६६ हजार ९00 हे. आणि कापूस केवळ ९ हजार ६00 हे., अमरावती सोयाबीन १ लाख ८१ हजार ५00 हे. तर कापूस १ लाख १८ हजार ९00 हेक्टर पेरणी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मात्र कापूस सर्वाधिक ३ लाख ७६ हजार १00 हे. तर सोयाबीन १ लाख ९२ हजार ६00 हेक्टरवर पेरण्यात आले.दरम्यान, सध्या सर्वत्र पाऊस सुरू असल्याने काही भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत.