शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, कापसाला भाव देऊन दुष्काळ जाहीर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:12 IST

अकोला: शेतमालाला योग्य भाव देण्यासह जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करण्यासाठी ‘एल्गार’ पुकारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचा ‘एल्गार ’ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेतमालाला योग्य भाव देण्यासह जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करण्यासाठी ‘एल्गार’ पुकारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.सोयाबीन प्रतिक्विंटल किमान ५ हजार रुपये, कापूस प्रतिक्विंटल ७ हजार रुपये आणि तुरीला प्रतिक्विंटल किमान ७ हजार रुपये भाव देण्यात यावा तसेच पाऊस कमी झाल्याने जिल्हय़ात मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. नापिकीमुळे जिल्हय़ातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, इत्यादी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या धरणे आंदोलनात माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार तुकाराम बिरकड, प्रा. विश्‍वनाथ कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदाणी, विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, श्रीकांत पिसे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष पद्मा अहेरकर, अँड. महेश सरप, भारती नीम, राजू बोचे, छाया कात्रे, नजिमा शेख, पंकज गावंडे, नगरसेविका उषा विरक, शंकरराव चौधरी, कैलास गोंडचवर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, शिवाजी म्हैसने, डॉ. आशा मिरगे, सचिन वाकोडे, रहीम पेंटर, मनोज गायकवाड, फैय्याजभाई, अजय रामटेके, अख्तर कुरेशी, दिलीप देशमुख, नितीन झापर्डे, अजय पागृत, गौतम गवई, रूपाली वाकोडे, महादेव साबे, गजानान म्हसने, लता वर्मा, प्रमोद लहाने, डॉ. अविनाश गावंडे, श्रीधर कांबे, छाया देशमुख, छाया कात्रे, अरुणा देशमुख, पंकज बाजारे, निखिल गावंडे, ज्ञानेश्‍वर माळी, बाळासाहेब तायडे, शुभम गोंडचवर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हय़ातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सावकारी कर्जमाफीचा शेतकर्‍यांना लाभ नाही; आंदोलन छेडणार-गुलाबराव गावंडे परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांसाठी शासनाने दोन वर्षांंपूर्वी कर्जमाफी जाहीर केली. राज्यातील शेतकर्‍यांना सावकारी कर्जमाफी देण्यासाठी २७१ कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली; मात्र या कर्जमाफीचा लाभ अद्यापही शेतकर्‍यांना मिळाला नाही. जिल्हय़ात ३ हजार शेतकर्‍यांनी सावकारांकडे सोने गहान ठेवले आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या सावकारी कर्जमाफीसाठी सात कोटींचा निधी प्राप्त झाला; मात्र या कर्जमाफीचा लाभ केवळ १२ शेतकर्‍यांना मिळाला. उर्वरित शेतकर्‍यांना सावकारी कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे यासंदर्भात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :agricultureशेती