शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सोयाबीनने व-हाडातील शेतक-यांना केले गारद !

By admin | Updated: October 16, 2014 00:57 IST

एकरी सरासरी दोन क्विंटल उत्पादन; पण दाणे निघाले अपरिपक्कव; पेरणीचा निम्मा खर्च निघणे कठीण.

राजरत्न सिरसाट/ अकोलाविदर्भातील वीस लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक हातचे गेले असून, एकरी सरासरी दोन िक्ंवटल उत्पादन होत नसल्याचे पाहून शेतकरी गारद झाला आहे. पेरणीचा खर्च तर निघणारच नाही, सोयाबीन काढणीचा खर्चही पेलवत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी दोन महिने उशिरा पाऊस आल्याने पेरण्यांना विलंब झाला. या प्रतिकुल परिस्थि तीमध्येही शेतकर्‍यांनी पश्‍चिम विदर्भात १५.५0 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. ऑगस्ट व सप्टेबर महिन्यात सुरू वातीचे दोन दिवस १२४ व ९0 मि.मी. पाऊस झाला; पंरतु त्यांनतर पावसाने दडी मारल्याने पिकांवर परिणाम झाला. अनेक किडींनी िपकाला ग्रासले, रसशोषण करणार्‍या कीडी प्रामुख्याने कापसावर हल्ला करतात; परंतु यावर्षी प्रथमच या किडीने सोयाबीन पिकावर हल्ला केला. त्यामुळे अचानक पिके वाळली, पाने पिवळी पडली. परिपक्वतेच्या अवस्थेत आलेल्या या पिकाला पाण्याची नितांत गरज होती; परंतु यावर्षी पाऊस तर नव्हताच आणि परतीच्या पावसानेदेखील पाठ फिरविल्याने पिकाचे दाणे भरले नाहीत. त्यामुळे उत्पादन घटले असून, सोयाबीनचे हे पिक अपरिपक्वअवस्थेतच पूर्ण वाळले आहे. या परिस्थितीने शेतकरी गारद झाला असून, त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.यावर्षी पावसाअभावी पेरणी उशिरा झाली आणि नंतर परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाने दडी मारली. प्रथमच या पिकावर रसशोषण करणार्‍या किडीचाही प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनला फटका बसला असून, उत्पादन घटले आहे. परिणामी अनेक ठिकाणी एकरी दोन ते तीन क्विंटलच्यावर उत्पादन होत नसल्याचे चित्र आहे. जिथे संरक्षित सिंचनाची व्यवस्था होती, तिथे सोयाबीन चांगले आले; परंतु हे प्रमाण एक टक्कयाच्यावर नसल्याचे प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ.सी.यु.पाटील यांनी स्पष्ट केले. *मशागत ते पेरणीचा खर्च एकरी पंधरा हजार शेतीची मशागत ते पेरणीचा खर्च सरासरी पंधरा हजार रू पये येतो. यावर्षी तर दुबार, तिबार पेरणी आणि किटकनाशकांचा खर्च वाढल्याने शेतकर्‍यांचे बजेट कोलमडले. यंदा सोयाबीनला ३२00 रू पये प्रति क्विंटल हमी भाव आहे. बाजारपेठेत कमाल भाव ३५00 रू पये प्रति क्विंटल आहे. यावर्षी एकरी सरासरी दोन क्विंटल उत्पादन होत आहे आणि दाणे परिपक्वनसल्याने भावात घसरण झाली आहे. मळणी आणि काढणीचा खर्च दोन हजार रू पये आहे. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.*शेतकर्‍यांवर मोठं संकटयावर्षी मूग, उडीद हे पीक शेतकर्‍यांना घेता आले नाही, कापूस हे पीक शेतकर्‍यांनी कमी केले आहे. सर्व भिस्त सोयाबीन पिकावर होती; तथापि या पिकाने शेतकर्‍यांची घोर निराशा केली आहे. सोयाबीन काढणीचा खर्च एकरी १६00 रूपये आणि मळणीचा खर्च प्रति िक्ंवटल ३00 रूपये आहे. हमी भाव प्रति क्विंटल ३२00 रूपये असले तरी सध्या बाजारात २९00 रू पये प्रतिक्विंटल भाव आहेत. त्यामुळे सोयाबीन काढणेदेखील कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत. ते नुकसान यापेक्षा जास्त आहे.