राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसत असून, अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तिफण बाहेर काढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी कापूस पेरणीला पसंती दिली असून, ६,५३८ हेक्टरवर केवळ कापसाची पेरणी झाली आहे.पाऊस, कर्जमाफी, बँकेक डून मिळणाऱ्या पीक कर्जाची प्रतीक्षा, या सर्व पृष्ठभूमीवर बियाणे बाजारात शुकशुकाट होता. पण, पेरणी करावीच लागणार असल्याने शेवटी गुरुवारपासून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. दोन दिवसांत ४० ते ४५ टक्के बियाणे खरेदी करण्यात आली असून, ५५ टक्के बियाणे खरेदी बाकी आहे.जिल्ह्यातील ४ लाख ८६ हजार ६०० हेक्टरसाठी कृषी विभागाने विविध खरीप पिकांचे नियोजन केले आहे. गेल्यावर्षी जवळपास २ लाख ३० हजार हेक्टरवर सोयाबीन, तर १ लाख २० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा केला होता. यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनची मागणी वाढली असली, तरी शेतकऱ्यांनी सध्यातरी कापसाचीच पेरणी केली आहे. यावर्षी २ लाख १५ हजार हेक्टरवर कृषी विभागाने सोयाबीनचे नियोजन केले आहे. कापसाचे गतवर्षीप्रमाणे १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र कायम राहील, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. असे असले तरी सुरुवातीच्या टप्प्यात कापूस बियाण्यांची पेरणी करण्यात आली आहे.दरम्यान, यावर्षी तूर ७० हजार हेक्टर, मूग ३१ हजार हेक्टर, उडीद २० हजार हेक्टर, ज्वारी २२,५०० हजार हेक्टर, बाजरी २२५ हजार हेक्टर, मका ३५० हजार हेक्टर, सूर्यफूल एक हजार हेक्टर, तर तिळाचे १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील या विविध पिकांसाठी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यासाठी ७३ हजार ५०४ क्ंिवटल बियाणे उपलब्ध झाले असून, ३४ हजार ५९७ क्ंिवटल बियाण्यांची विक्री झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र घटणार!सोयाबीनचे क्षेत्र १५ हजार हेक्टरने कमी होण्याची शक्यता आहे. कापसाचे सरासरी पेरणी क्षेत्र गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कायम राहील. पण, सुरुवातीला जिल्ह्यात कापूस बियाणे पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याने यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याचे संकेत आहेत.दमदार पावसाची प्रतीक्षाशेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने नांगरटी केली, पण पट्टापास मशागतीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.अकोट तालुक्यात पेरणीला वेगजिल्ह्यात सर्वाधिक ४,२०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी सुरुवातीला कापूस बियाणे पेरणी केली आहे, तर सर्वाधिक कमी पेरणी अकोला तालुक्यात झाली.बियाणे खरेदीला सुरुवात झाली असून, घाऊक खरेदी जवळपास ८० टक्क्यांपर्यंत झाली आहे, तसेच किरकोळ बियाणे खरेदीला वेग आला आहे.- मिलिंद सावजी, - मोहन सोनोने,बियाणे विपणन अभ्यासक, अकोला.