शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मध्य रेल्वे दिल्लीला जाण्याकरिता सोडणार २४ विशेष गाड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:21 IST

अकोला : दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्यावतीने दिल्लीला जाण्याकरिता २४ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमे, जून आणि जुलै महिन्यात जवळपास २४ विशेष गाड्या सोडण्याचे ठरविण्यात आले आहे.दिल्ली, आग्रा, भोपाळ, मथुरा, झांशी आदी ठिकाणी जाण्याकरिता विशेष गाडी चालविण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. खासदार संजय धोत्रे यांचा दक्षिण मध्य रेल्वेकडे सतत पाठपुरावा सुरू होता.

अकोला : दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्यावतीने दिल्लीला जाण्याकरिता २४ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी सुट्यांनिमित्त दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये भरपूर गर्दी होत आहे. यामुळे दिल्ली, आग्रा, भोपाळ, मथुरा, झांशी आदी ठिकाणी जाण्याकरिता विशेष गाडी चालविण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. याबाबत खासदार संजय धोत्रे यांचा दक्षिण मध्य रेल्वेकडे सतत पाठपुरावा सुरू होता. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन नांदेड येथून दिल्लीला जाण्याकरिता मे, जून आणि जुलै महिन्यात जवळपास २४ विशेष गाड्या सोडण्याचे ठरविण्यात आले आहे.गाडी संख्या ०२४८५ नांदेड ते हजरत निझामुद्दीन ही गाडी नांदेड रेल्वेस्थानकातून दर गुरुवारी रात्री २३.०० वाजता सुटेल. त्यानंतर पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला खांडवा, इटारसी, भोपाळ, झांशी, आग्रा, मार्गे निझामुद्दीन येथे शनिवारी रात्री २.०० वाजता पोहोचेल. ही गाडी नांदेड येथून दिनांक १०, १७, २४, ३१ मे, ७, १४, २१, २८ जून आणि ५, १२, १९, २६ जुलै २०१८ रोजी सुटेल.गाडी संख्या ०२४८६ निझामुद्दीन ते नांदेड विशेष गाडी निझामुद्दीन रेल्वेस्थानकावरून दर शनिवारी सकाळी ०५.५० वाजता सुटेल. त्यानंतर आग्रा, झांशी, भोपाळ, इटारसी, खंडवा, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत मार्गे नांदेड येथे रविवारी सकाळी ०७.०० वाजता पोहोचेल. ही गाडी निझामुद्दीन येथून दर शनिवारी दिनांक १२, १९, २६ मे, २, ९, १६, २३, ३० जून आणि ७, १४, २१, २८ जुलै -२०१८ रोजी सुटेल. या गाडीस एक द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय श्रेणी वातानुकूलित, सात द्वितीय श्रेणी शय्या, सहा जनरल आणि दोन एसएलआरचे असे १७ डब्बे असतील.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक