शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही जास्त भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

लोकांकडून आहारात प्रामुख्याने बाजरी, ज्वारी, गहू या धान्याचा अधिक उपयोग करण्यात येतो. काही प्रमाणात नाचणी, मका यांचाही वापर केला ...

लोकांकडून आहारात प्रामुख्याने बाजरी, ज्वारी, गहू या धान्याचा अधिक उपयोग करण्यात येतो. काही प्रमाणात नाचणी, मका यांचाही वापर केला जातो. ३० वर्षांपूर्वी ज्वारीला आहारात अधिक स्थान होते तर गहू सणाला व पाहुणे मंडळी आली की वापरला जात होता; पण गेल्या काही वर्षांत ज्वारीपेक्षा गव्हाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे गव्हाचा दर कमी झाला आहे. त्यातच डॉक्टरही ज्वारी आरोग्यासाठी चांगली असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे गव्हापेक्षा ज्वारीला आहारात प्राधान्य मिळत चालले आहे. भाकरी रोज खाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे, तर चपाती खाणारे नागरिक शहरी भागात अधिक आहेत.

आपल्या आरोग्याची श्रीमंती ज्वारीतच!

१. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमधून शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. तसेच ज्वारीच्या भाकरीमुळे अन्नाचे सहज पचन होते.

२. ग्रामीण भागात आजही ज्वारीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कदाचित शहरीपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच ज्वारी फायदेशीर ठरत आहे.

३. ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो, त्यांनी चपातीऐवजी आहारात ज्वारीचा समावेश करावा, असे सांगण्यात येते.

अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रतिक्विंटल दर)

ज्वारी गहू

१९८० ९०० १०००

१९९० १२०० १४००

२००० १८०० २०००

२०१० २५०० २२००

२०२० २८०० २२००

२०२१ २८५० १९००

भाकरी परवडायची म्हणून खायचो...

ज्वारीची भाकर सकस असते. खाल्ल्यानंतर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. तुराटी किंवा कोळशाच्या चुलीवर भाकर शेकता येते. गव्हाच्या तुलनेत भावही कमी होते. त्यामुळे ज्वारीची भाकरच खायचो.

- जगन्नाथ गावंडे

ज्वारी पचनाला सुलभ आहे. भरपूर जीवनसत्व असल्याने कमी खाऊनही पोट भरल्यासारखे वाटते. चरबी वाढत नाही. ज्वारीची भाकर खाल्ल्याने अनेक आजार टळतात. आधी ज्वारीचे भाव कमी होते. आज गहू अन् ज्वारीचे भाव जवळपास सारखेच आहेत.

- अशोक देवर

आता चपातीच परवडते...

ज्वारीत साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह टाळण्यासाठी रोज गव्हाची पोळी, फुलके खाणे चांगले आहे. चांगल्या प्रतीचा गहू सहज उपलब्ध होत असल्याने व चपाती भोजनात रुची आणते. ज्वारीच्या तुलनेत गव्हाचे भाव कमी आहेत. गव्हाची चपाती रोज व ज्वारी कधीतरी आहारात बदल म्हणून खातो.

- अरविंद पिसोळे

आरोग्याच्या दृष्टिकोनातून जेवणात ज्वारी, बाजरीची भाकरी असते. तसेच चपाती खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. सवय असल्याने चपातीलाच अधिक प्राधान्य असते. दररोज एकवेळ तरी चपाती आवडीने खाल्ली जाते.

- विजय मानेकर

जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन कमालीचे घटले

जिल्ह्यात गहू, हरभरा, सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांचे उत्पादन होत असते.

जवळपास अडीच दशकांपूर्वी ज्वारीचे पीकही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. मात्र, सद्य:स्थितीत जिल्ह्यात ज्वारीची लागवड अत्यल्प प्रमाणात करण्यात येते.

त्यामुळे उत्पादन घटल्याने अन्य राज्यांतून किंवा जिल्ह्यांतूनच आयात केली जाते.

त्यामुळे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

असे झाले उत्पादन

२०१९ १६१ मे.टन

२०२० ६९ मे.टन

२०२१ ५१ मे.टन