शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलची परंपरा जोपासत आहे सुफियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:22 IST

अकोला : उस्मानाबाद येथे २९ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय  शालेय फुटबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स् पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र  संघात अकोल्याचा सुफियान शेख याची निवड झाली आहे.

ठळक मुद्देसलग तिसर्‍या वर्षी सुफियान शेख महाराष्ट्र संघात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उस्मानाबाद येथे २९ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय  शालेय फुटबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स् पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र  संघात अकोल्याचा सुफियान शेख याची निवड झाली आहे.  जम्मू-काश्मीर येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत सुफियान महाराष्ट्राचे  प्रतिनिधित्व करणार आहे. सुफियान सलग तिसर्‍या वर्षी राष्ट्रीय  शालेय स्पर्धेत खेळप्रदर्शन करणार आहे, हे येथे उल्ल्ेाखनीय.सुफियान अवघ्या १५ वर्षांचा आहे. सुफियान त्याच्या घराण्याचा  फुटबॉल वारसा पुढे नेण्यासोबतच, अकोला जिल्हय़ाची  फुटबॉल क्रीडा परंपरा जोपासत आहे. सुफियानचे आजोबा शेख  चांद हे अकोल्यातील पहिले संतोष ट्रॉफी प्लेअर आहेत. वडील  फईम शेख महाराष्ट्र पोलीस विभागाचे स्टार फुटबॉलपटू आहेत.  अलीकडच्या काळात सुफियान राज्य-राष्ट्रीय स्पर्धेत  अकोल्याचे नाव झळकावित आहे.उस्मानाबादमध्ये झालेल्या स्पर्धेत सुफियानने १७ वर्षाआतील  वयोगटात क्रीडापीठाचे प्रतिनिधित्व करीत बीईजी पुणे संघासोब त झालेल्या अंतिम सामन्यात निर्णयाक गोल करू न आपल्या  संघाला विजय मिळवून दिला. ३-0 ने क्रीडापीठाने सामना  जिंकला. मागील दोन वर्षांपासून सुफीयान क्रीडाप्रबोधिनी बालेवाडी पुणे  येथे शिक्षण घेत आहे. प्रशिक्षक धीरज मिश्रा यांच्या मार्गदर्शनात  सुफियानचा फुटबॉल प्रवास यशस्वी सुरू  आहे. अकोल्यात सेंट  अँन्स स्कूलमध्ये सुफियान शिकत होता. क्रीडा शिक्षक राजेश  ठाकरे  व क्रीडा संघटक सय्यद जावेद अली यांचे वेळोवेळी  सुफियानला मार्गदर्शन लाभत असते.  

असा आहे महाराष्ट्राचा संघ१७ वर्षाआतील महाराष्ट्र संघात अब्दुल्लाह रंगरेज लातूर, मयूरेश  चौगुले, ओमप्रकाश चौगुले, ओंकार लयकर, प्रवीण घाटगे,  सूर्यप्रकाश ससाणे कोल्हापूर, महंमद दानेश औरंगाबाद, तुषार  देसाई, महमंद शेख, शिवराज पाटील, सुफियान शेख, शांतनू  निंगुळकर क्रीडाप्रबोधिनी पुणे, भूषण जेरपोटे, फरखान रजा नाग पूर, प्रथमेश शिंदे नाशिक, अमितसिंग रबाना मुंबई, शौनक  गायकवाड, सादिर सुब्वाह पुणे यांचा समावेश आहे. रा खीवमध्ये यश मरडेकर, रहिम खेसे, रॉड्रीक, विश्‍वनाथ शेळके,  विनायक वरनागे, कुणाल चव्हाण, बलराज कच्बुले यांचा  समावेश आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा