शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही लवकरच कारवाईचे सत्र !

By admin | Updated: October 9, 2014 01:37 IST

विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी भोवणार

अकोला : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रचार करणार्‍या आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंवर लवकरच कारवाई होणार आहे. मूर्तिजापूर मतदारसंघातून प्रतिभा अवचार यांनी केलेल्या बंडखोरीची माहिती पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी तुटल्याने दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीवरून प्रचंड रस्सीखेच झाली. कॉँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्षांतर करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. मात्र कोणत्यातच पक्षातून उमेदवारी न मिळालेले काही जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असून, काही पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध प्रचार करीत आहेत. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीच कॉँग्रेसने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात प्रचार केल्याप्रकरणी १0 आजी-माजी पदाधिकार्‍यांना निलंबित केले होते. यानंतर आता कारवाईचे सत्र आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही सुरु होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य प्रतिभा अवचार या अपक्ष म्हणून मूर्तिजापूर मतदारसंघातून रिंगणात उतरल्या आहेत. प्रतिभा अवचार यांनी २00९ च्या विधानसभा निवडणुकीत मूर्तिजापूर मतदारसंघातून राकॉँ तिकिटावर निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. नवख्या उमेदवार असूनही त्यांनी मूर्तिजापूर मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना दिलेले लढत बघता यावेळी पुन्हा त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयापासूनच त्या या मतदारसंघात सक्रिय झाल्या होत्या. आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना मूर्तिजापूरमधून तिकिट नाकाली. तसेच पक्षश्रेष्ठींकडून त्यांना तिकिटा मागे घेण्याबाबत सूचना देण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे आता पक्षाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्षांनीन त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविला आहे.