शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

स्त्रीरोग विभागातील सोनोग्राफी मशीन बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:28 IST

सोनोग्राफीसाठी गर्भवतींना जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचे उत्तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील सोनोग्राफी मशीन बंद पडली आहे. त्यामुळे गत अनेक दिवसांपासून येथे येणाऱ्या गर्भवतींना सोनोग्राफीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यातील रुग्ण व गर्भवती मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात; परंतु येथील महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे नादुरुस्त असल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे. असाच काहीसा प्रकार स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील असून, गत काही महिन्यांपासून येथील सोनोग्राफी मशीन नादुरुस्त आहे. परिणामी वैद्यकीय तपासणीसाठी येणाºया गर्भवतींना केवळ सोनोग्राफीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाची वाट दाखविली जाते. त्यामुळे गर्भवतींना नाइलाजास्तव हेलपाटे घेत जिल्हा स्त्री रुग्णालयात जावे लागते. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे महानगराध्यक्ष आशीष सावळे यांनी अनेकदा तक्रार दिली आहे; परंतु मशीन बंद असल्याने सोनोग्राफीसाठी गर्भवतींना जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचे उत्तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आले.कंपनीकडून जीएमसीला प्रतिसाद नाही!गत काही महिन्यांपासून येथील सोनोग्राफी मशीन बंद असल्याची तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे संबंधित कंपनीकडे करण्यात आली आहे; परंतु यापूर्वी मशीन दुरुस्तीची थकबाकी अदा न करण्यात आल्याने कंपनी जीएमसी प्रशासनाला प्रतिदास देत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय