शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

सोनसाखळी चोरीच्या प्रकरणास कलाटणी

By admin | Updated: June 10, 2014 14:17 IST

महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी पळविताना नागरिकांनी रंगेहाथ पकडून मार खाणार्‍या आणि त्यानंतर रात्रभर पोलिस स्टेशनमध्ये घालवाव्या लागणार्‍या एका पोलिस निरीक्षक पुत्राच्या प्रकरणाची माहिती काही औरच निघाली.

 

पोलिस निरीक्षक पुत्राची सुटका

अकोला - महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी पळविताना नागरिकांनी रंगेहाथ पकडलेल्या, पकडल्यानंतर नागरिकांचा बेदम मार खाणार्‍या आणि त्यानंतर रात्रभर पोलिस स्टेशनमध्ये घालवाव्या लागणार्‍या नागपूर येथील एका पोलिस निरीक्षक पुत्राच्या प्रकरणाची माहिती सोमवारी काही औरच निघाली. सोनसाखळी चोरीचा कोणताही प्रयत्न या पोलिस पुत्राकडून झालाच नाही. तो केवळ एक अपघात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली असून, याप्रकरणी कोणतीही तक्रार झाली नसल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. नागपूर येथील पोलिस निरीक्षक बाबुसिंह राठोड यांचा मुलगा प्रशांत याला रविवारी रात्री नागरिकांनी पकडून, खदान पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आळशी प्लॉट भागातील एक महिला पायी जात असताना, तिच्या गळय़ातील सोनसाखळी लंपास करण्याचा त्याने प्रयत्न केला होता, असे या नागरिकांचे म्हणणे होते. या नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हा रविवारी रात्री त्याच्या मित्रासोबत नेहरू पार्क चौकानजीक असलेल्या एनसीसी कार्यालयासमोर उभा होता. त्यावेळी आळशी प्लॉट भागातील एक महिला तिच्या घराकडे पायी जात होती. प्रशांत व त्याच्या मित्राने त्या महिलेच्या गळयातील सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र रात्रीचा फेरफटका मारण्यासाठी आलेल्या परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडून चांगलेच बदडले. त्यानंतर प्रशांतला खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रविवारी रात्री एक वाजतापासून सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत प्रशांत खदान पोलिसांच्या ताब्यात होता. सोमवारी दुपारी त्याला सोडून देण्यात आले.प्रशांतने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो दुचाकी घेऊन त्या महिलेच्या अंगावर पडला. त्यामुळे महिलेची सोनसाखळी आपल्या हातात आली. त्याचे म्हणणे खदान पोलिसांनी ग्राह्य धरले. याशिवाय संबंधित महिलेनेही तक्रार दिली नसल्याने त्याला सोडून देण्यात आले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)