अकोला : बालाजीनगर येथील रहिवासी असलेली ६५ वर्षीय महिला रविवारी दुपारी इन्कम टॅक्स चौकातून बालाजीनगर येथे त्यांच्या घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळय़ातील सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली. सुमारे ४५ हजार रुपयांची ही सोनसाखळी असल्याची माहिती असून, खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बालाजीनगरातील रहिवासी पुष्पलता बेंबाळे यांच्या मुलाचे इन्कम टॅक्स चौकामध्ये मोबाइलचे दुकान आहे. त्या रविवारी दुपारी दुकानावर आल्या होत्या. त्यानंतर दुपारी ३ वाजता परत जात असताना पाठीमागून लाल शर्ट घालून दुचाकीवर आलेल्या एका युवकाने त्यांच्या गळय़ातील सोनसाखळी हिसकून पळ काढला. वृद्धेने आरडा ओरड केली; मात्र तोपर्यंत चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
वृद्धेची सोनसाखळी पळविली!
By admin | Updated: July 25, 2016 01:54 IST