शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सौर उर्जा प्रकल्प, एलइडीसाठी लागणार महाउर्जाची मंजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 12:42 IST

अकोला : अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून (सौर ऊर्जा) वीज निर्मिती, पारेषण, ग्रामीण भागात एलईडी सौर पथदिवे, घरगुती दिवे लावण्याच्या प्रकल्पांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दिलेली मंजुरी यापुढे अवैध ठरणार आहे.

ठळक मुद्देअकोला येथेच विभागीय कार्यालय सुरू झाल्याने शासन निर्णयानुसार महाऊर्जाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यामुळे यापुढे इतर विभागांनी दिलेली मंजुरी अवैध ठरणार आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून (सौर ऊर्जा) वीज निर्मिती, पारेषण, ग्रामीण भागात एलईडी सौर पथदिवे, घरगुती दिवे लावण्याच्या प्रकल्पांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दिलेली मंजुरी यापुढे अवैध ठरणार आहे. ती मंजुरी देण्यासाठी पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यांचे विभागीय कार्यालय अकोल्यात सुरू झाले असून, त्या कार्यालयाची मंजुरी बंधनकारक करण्यात आली आहे.अपारंपरिक उर्जेसंदर्भातील विविध प्रकल्प राबवणे, राज्याचे ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ राबवणे, नित्यनूतन ऊर्जा खरेदीचे बंधन, संशोधन व विकास, जैविक उर्जेसंदर्भातील प्रकल्पांची अंमलबजावणी, अंदाजपत्रके, तांत्रिक मंजुरी देण्याचे अधिकार महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या यंत्रणेला आहेत. त्यामुळे इतर विभागाने दिलेली तांत्रिक मंजुरी अवैध ठरते. यापूर्वी अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात महाऊर्जाचे कार्यालय नसल्याने शासनाच्या इतर विभागांनी बांधकाम विभागाची मंजुरी घेत उपक्रम राबवले. आता अकोला येथेच विभागीय कार्यालय सुरू झाल्याने शासन निर्णयानुसार महाऊर्जाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे इतर विभागांनी दिलेली मंजुरी अवैध ठरणार आहे.- या उपक्रमांसाठी लागणार महाऊर्जाची मंजुरीपारेषण संलग्न अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये वारामापन कार्यक्रम, पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प, उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती, कृषीजन्य अवशेषावर आधारित वीज निर्मिती, लघुजल विद्युत प्रकल्प, सौर उर्जा निर्मिती प्रकल्प, तर पारेषण विरहित अपारंपरिक ऊर्जा साधनांमध्ये इमारतीचे छत व जमिनींवरील पारेषण विरहित सौर विद्युत संच, लघुजल व नळ पाणी पुरवठ्यासाठी सौर पंप, स्वयंपाकासाठी सौर उर्जेवर आधारित सयंत्र, सौर उष्णजल सयंत्रे, विकेंद्रित सूक्ष्म पारेषण पथदर्शी प्रकल्प, बायोगॅसपासून विकेंद्रित वीज निर्मिती प्रकल्प, एलईडी सौर पथदिवे, घरगुती दिवे, छोटे सोलर पॉवर पॅक, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, शासकीय इमारतींमध्ये पारेषण संलग्न रुफटॉप आणि लघू सौर उर्जा प्रकल्प.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना