शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडात आतापर्यंत एक लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान!

By admin | Updated: April 15, 2015 02:00 IST

शनिवारच्या पावसामुळे अकोला जिल्हय़ात १६00 हेक्टरवरील फळ, पिकांना फटका.

अकोला : जानेवारी महिन्यापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील एक लाख हेक्टरच्यावर गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. पण, एप्रिल महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे नुकसानाचे आकडे बदलत असून, पुन्हा सर्वेक्षण सुरू आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती याच पाच जिल्हय़ात गेल्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे उत्पादन घटले आहे. रब्बी पिकांवर आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांना या पावसाने पीक ऐन काढणीच्यावेळी फटका दिल्याने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तेव्हापासून अवकाळी पाऊस सुरू असून, शेतकर्‍यांना उसंत देत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या अवकाळी पावसाला १४ डिसेंबरपासून सुरुवात झाली, ते जानेवारी १५ पर्यंत हा पाऊस अधूनमधून सुरू होता. सोसाट्याचा वारा, गारासंह आलेल्या या पावसामुळे पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्हय़ातील ८,८७0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ९ ते १५ फेब्रुवारीपर्यंत आलेल्या या अवकाळी पावसाचा ९,९३७ हेक्टर क्षेत्रावरील सर्वच प्रकारच्या पिकांना प्रचंड फटका बसला, पण हा पाऊस उसंतच देत नसल्याने पुन्हा २८ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत पडलेल्या पावसामुळे सर्वाधिक ४५ हजार ३९0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. ८ ते १२ मार्चपर्यंत हा पाऊस सतत सुरू असल्याने या पाच जिल्हय़ातील १६,६४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. यावर्षीच्या पावसाळ्य़ात कमी पाऊस झाल्याने उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला, तर रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी अवकाळी पावसाने दगा दिला आहे. एप्रिल महिन्यात पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शनिवारी व रविवारी प्रचंड गारांसह पाऊस कोसळला. या पावसामुळे अकोला जिल्हय़ातील १६00 हेक्टरवरील फळे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.