शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक संवेदना झाल्या बोथट

By admin | Updated: July 5, 2014 01:00 IST

बलात्काराच्या घटनेनंतर निषेधाचा सूर मंद, कुठेही प्रतिक्रिया नाही

मलकापूर : मलकापूरच्या नावाला काळीमा फासणारी घटना परवा घडली. कुमारिकेवर वासनांध तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. मात्र राजकीय, सामाजिक संघटनांकडून एक दोन अपवाद वगळता जिल्हाभरात साधा निषेधही नोंदविण्यात आला नाही. त्यामुळे येथील सामाजिक संवेदना बोथट झाली की अशा प्रकारांना मुक सर्मथन? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाच्या तालुक्यांपैकी एक असे मलकापूर. जातीय दंगलीकरिता एकेकाळी कुप्रसिध्द त्यामुळेच शासन दरबारी अतिसंवेदनशिल स्थळ म्हणून त्याची नोंद होती, अर्थात मागील दोन दशकात तशी परिस्थिती राहिली नाही, पण वाद भांडण, घोडी कुरघोडी सुरुच असतात. इतर ठिकाणसारख्याच छोट्यामोठय़ा घटना इथेही घडतात मात्र एखाद्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घडलेली घटना येथील समाजीक स्वास्थ धोक्यात आल्याचे लक्षण आहे. परवा रात्री एक कुमारीका याच जिल्ह्यातील मात्र सद्याचे वास्तव्य मुंबईत तिच्या मावशासह मलकापुरात येते अन तिच्यावर सामूहिक बलात्कार वासनांध तरुण करतात ही तर दूष्कृत्याची परिसिमाच आहे. दिल्लीतल्या बलात्काराने मलकापूरकर प्रभावित होतात. वेळप्रसंगी आरोपींचे फाशीसाठी कँडलमार्चच्या माध्यमातून रस्त्यावर येतात. वृत्तपत्रात छापूनही आणण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे अनेकदा घडले आहे.इथे मात्र परिस्थिती पुरती वेगळीच निदर्शनास येते. पोलिसांनी पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात आरोपींना अटक करण्यापासून तर गुन्ह्याचा तपास व आरोपींवर निर्धारीत केलेल्या कलमा बघता केलेली कारवाई चोख अशीच आहे. मात्र राजकारण व समाजकारणात काम करणार्‍या काँग्रेस कमेटी व मनसे वगळता कोणीही निषेधाचा सुर लावला नाही. काल आरोपीना न्यायालयात नेले होते तेथे बलात्कारीत कुमारीकेला बघण्यासाठी जिवाचा आटापिटा अनेकांनी केला यामधून आपली मानसीकता कुठे जात आहे याचे प्रत्यंतर आले मात्र एवढाच आटापिटा या बलात्काराच्या घटनेबाबत विरोध नोंदविण्यासाठी झाला असता तर बलात्कारी वृत्तींवर धाक बसला असता. मलकापुरात कुमारिकेवरील बलात्काराच्या प्रकरणात अपवाद वगळता साधा निषेधही कुणी नोंदविला नाही. दिल्लीसारखीच मलकापुरातही लेकबाळ सुरक्षीत नाही हे या घटनेवरुन स्पष्ट होते. विशेष म्हणजे ३३ टक्के आरक्षणाकरिता महिलांचे विविध सेल पुढे येतात इथे मात्र गप्प कशासाठी? चार-दोन वाईट प्रवृत्तीमुळे इमानदार ऑटोचालकांवर प्रश्नचिन्ह नको परंतु अँटो चालकांनीही अशा घटनेचा निषेध नोंदवू नये का?पोलिसांचा पाठपुरावा व न्यायालय त्या नराधमांना शासन करेलच यात शंका नाही. मात्र बोथट झालेल्या स्थानिक समाजभावनेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.