शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

उमेदवारांच्या विरोधात सोशल मीडियावर प्रचार!

By admin | Updated: February 5, 2017 02:43 IST

भाजपने घेतली बैठक; सोशल मीडियावरील प्रचाराला देणार चोख उत्तर.

अकोला, दि. ४-महापालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. हमखास निवडून येणार्‍या काही उमेदवारांच्या विरोधात आतापासूनच सोशल मीडियाद्वारे गरळ ओकण्याची कामे सुरू झाली असून, यासंदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून भाजपच्यावतीने शनिवारी सिंधी कॅम्प परिसरात बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्या-त्या प्रभागांमध्ये राजकीय पक्षांचे उमेदवार नेमके कोण,याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी बहाल केल्याचे दिसून येते. एका प्रभागातून चार उमेदवारांना निवडून द्यावे लागणार असल्याने राजकीय पक्षांच्या पॅनेलमध्ये सर्वसमावेशक चार उमेदवारांना स्थान देण्यात आले. हा प्रयोग शहराच्या प्रत्येक प्रभागात झाल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच हमखास निवडून येणार्‍या उमेदवारांच्या विरोधात राजकीय व्यूहरचना आखली जात असून, समाज बांधवांच्या मतांमध्ये फूट टाकण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. यावर वेळीच खबरदारी म्हणून शनिवारी भाजपच्यावतीने निवडणूक रिंगणात उभे असणार्‍या दक्षिण झोनमधील सर्व उमेदवारांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सिंधी कॅम्पस्थित हरदास भवनमध्ये ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत सोशल मीडियावरील प्रचाराला चोख उत्तर देण्याचीही व्यूहरचना आखल्याची माहिती आहे. दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडविण्याच्या कुटील राजकारण हाणून पाडण्यासाठी विचारमंथन करून पुढील दिशा ठरवण्यासाठी भाजपच्यावतीने उद्या, रविवारी सकाळी ११ वाजता निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.